BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवलीला आनंदी शहर करायचं आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महायुतीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली परिसरात विविध प्रकल्प राबविले जात असून अनेक विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली या शहरांना आनंदी शहर बनवायचं असल्याचे सांगत कोणी कितीही करूद्या दावेदारी महायुतीच राखणार कल्याणची सुभेदारी असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर आयोजित विजय संकल्प सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील आदींसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा नंबर पहिला. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकी नंतर आता महापालिका निवडणुकीत चौकार षटकार मारायचा आहे. विरोधकांचा सुपडा साफ करायचा आहे. ६० हुन अधिक नगरसेवक निवडून येऊन विजयाची नांदी सुरू झाली आहे. काही लोकं फक्त टीका टिपण्णी करतात, दुसऱ्यांचा आधार घेऊन काही लोकं मला बुडविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत. आपल्यावर कितीही टीका झाली आरोप झाले तरी या आरोपांना मी कामातून उत्तर देतो. 

काहींनी खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. घरी बसून सरकार चालवता येत नाही.  लोकांणा सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. काही लोकं मुंबईकडेच लक्ष लावून बसले आहेत. काहींचा डोळा मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरीवर असून आमचा डोळा मुंबईच्या विकासावर आहे. निवडणूक आली की मुंबईतील मराठी माणूस विरोधकांना आठवतो.   
कल्याण हे मुंबईचे शॉकऍपजोबजर आहे. मुंबईचा भार हे उपनगर सांभाळत आहेत. पाच वर्षात कल्याण हे आघाडीचे शहर बनवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. कल्याण-डोंबिवली धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केल्या जातीलअडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले गेले. सर्वसामान्याचा विकास, शहरांचा विकास झाला पाहिजे यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक विकासकामे केली जात आहेत. 

कल्याण ऐतिहासिक नगरी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची सुरवात येथून झाली त्याचे स्मारक केलं आहे. ईस्ट या वेस्ट कल्याण झालं बेस्ट. लोकांना न्याय देणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहते. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे मी प्रतिपादन करतो.रखडलेले पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत