मुंबई दि.०९ : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा पटकाविण्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा आणि महाराष्ट्र विकस आघाडी पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकून राज्यातील जनतेचा कौल आपल्यालाच आहे हे परत सिद्ध केले. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हीच राजकारणातील आजची जोडी नं. १ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि रविंद्र चव्हाण यांच्या नियोजनाच्या बळावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा मिळविण्याची अनोखी हॅटट्रिक प्राप्त केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगर परिषद निवडणूका, त्यानंतर जानेवारीत झालेल्या महानगरपालिका निवडणुका आणि या फेब्रुवारी महिन्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत देवेंद्र आणि रविंद्र या राजकीय पॉवरफुल जोडीने अचूक निवडणूक नियोजन, प्रभावी प्रचार यंत्रणा पद्धती, स्थानिक पातळीवरील पक्षासोबत राज्य पातळीवरील पक्षाचा थेट संवाद आणि समन्वय अशा विविध माध्यमातून भाजपाला उच्च दर्जाची सक्षम पक्ष यंत्रणा उभारली. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला शीर्षस्थ नेतृत्वाचा वरदहस्त लाभला आणि धाकही जाणवला. याचा सकारात्मक परिणाम होऊन पक्षाने अनेक ठिकाणी अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायक विजय नोंदवले. या यशाचे मुख्य शिल्पकार देवेंद्र फडणवीस तर सूत्रधार रविंद्र चव्हाण हे आहेत हे निर्विवादपणे म्हणावे लागेल.
रविंद्र चव्हाण यांना निवडणूक सिद्ध नेता म्हणून ओळखले जाते. ते जमिनीवर वावरणारे आणि कार्यकर्त्यात रमणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणुकीत अत्यावश्यक असणारे साम, दाम, दंड, भेद वापरताना विचारधारेच्या धाग्याने कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जोडणारे असे त्यांचे नेतृत्त्व आहे म्हणूनच दिल्ली आणि नागपूर दोन्ही सत्ताकेंद्रांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्याच बरोबर त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आणि सहकार्य कायम मिळतच असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा