BREAKING NEWS
latest

कसारा जलद लोकलचा दिवा थांबा रद्द करण्याची प्रवासी संघटनेची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कसारा जलद लोकलचा दिवा स्थानकातील थांबा रद्द करावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. या सर्व लोकलला दिवा स्थानकात थांबा दिल्याने अधिक प्रमाणात गर्दी होत आहे. दिवा, ठाणे स्थानकात उतरण्याचा दरवाजा एकाच दिशेला येत असल्याने प्रवाशात भांडणे होत आहेत.

संघटनेचे सचिव उमेश विशे यांनी ही मागणी करत सांगितले की, प्रवाशांमध्ये अशा घटना वाढत असून, आता त्या शाब्दिक बाचाबाची, हाणामारीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. नव्याने येणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, दिव्यांग, महिलांना ठाणे स्थानकात उतरणे आणि चढणे अत्यंत कठीण आणि जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. भविष्यात ही स्थिती अशीच राहिली तर प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत होऊन उद्रेक होईल.
कळवा-मुंब्रा मार्गावर गेले सर्वाधिक बळी

डोंबिवली-कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सर्वाधिक लोकलमधील प्रवासात बळी गेले आहे. दोन्ही स्थानकांतील गर्दी कमी करण्यासाठी पारसिक स्थानक पुन्हा सुरू करा, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सिद्धेश देसाई यांनी केली आहे. त्यांनी नव्या ठाणे स्थानकापेक्षा पारसिक स्थानक व्हावे असे म्हटले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत