BREAKING NEWS
latest

दिवा शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे आयोजन..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.०३ मार्च - दिवा शहरात प्रथमच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. दिवा शहरातील लोकप्रिय 'प्रभास कराटे स्पोर्ट एकॅडमी' यांच्या माध्यमातून प्रोफेसर प्रशांत कसबे यांच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनातून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेसाठी विविध शहरांमधून अनेक संघ आणि स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि दिवा शहराच्या नावलौकिकात भर घातली. विजेत्या स्पर्धकांना गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ पदके तसेच विविध सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १ ते ५ क्रमांकाच्या संघांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक विजेते संघ:
 प्रथम पारितोषिक – चंचल स्पोर्ट्स, नाशिक (आनंद रोकडे सर), द्वितीय पारितोषिक – प्रभास कराटे स्पोर्ट्स एकॅडमी, दिवा (प्रशांत कसबे सर, भारती कसबे मॅडम), तृतीय पारितोषिक – वॉरिअर स्पोर्ट कराटे असोसिएशन, गवंडी (प्रदीप ओव्हाळ सर), चतुर्थ पारितोषिक – थापा सर यांचा संघ, पंचम पारितोषिक – उमा मॅडम, टिटवाळा यांचा संघ

स्पर्धेचे पंच म्हणून युनायटेड मार्शल आर्ट एकॅडमी इंडियाचे ग्रँडमास्टर रवींद्र केणी सर (सायन), ना. सी. मुलानी सर (ठाणे) आणि कोरी सर (कल्याण) यांनी कुशल नेतृत्व करत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. आयोजन व नियोजनात दिवा शहरातील समाजसेवक प्रविण उतेकर, आकाश विचारे, आयु. जयसिंग कांबळे, सतीश निकम, आयु. विश्वास भालेराव, विशाल मन्ना डे, संगीता उतेकर, पार्वती आनंदा कसबे, मनीषा सुरेश लांडगे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धांचे आयोजन करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे दिवा शहरातील भावी पिढी सक्षम, आत्मविश्वासू आणि शिस्तबद्ध बनवणे हेच असल्याचे प्रशांत कसबे व भारती कसबे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे दिवा शहरात क्रीडा क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत