BREAKING NEWS
latest

नाशिक शिंपी समाज एकता महिला मंडळातर्फे 'रणरागिनी पुरस्कार' सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक - नाशिक सिडको येथील शिंपी समाज एकता महिला मंडळातर्फे 'महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा' ग्रुप च्या सौजन्याने नाशिक सिडको येथील लक्ष्मीधवल कार्यालयात "रणरागिनी पुरस्कार सोहळा २०२६" चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून शिंपी समाज एकता महिला मंडळाचा अध्यक्षा सौ.माया मिलिंद चव्हाण संकल्पनेनुसार, ऍड. गीतांजली बागुल, अखिल भारतीय शिंपी समाज महिला कार्याध्यक्षा सुनिता शिंपी व ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक श्री. जयराम मुरलीधर चव्हाण यांचा प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला. 

यावेळी शिंपी समाज एकता महिला मंडळातील शिंपी समाजातील विविध क्षेत्रात उद्योग व्यवसाय नोकरी करून समाजसेवा करण्यासाठी तत्पर आणि कुटुंबासाठी हातभार लावणाऱ्या ३५ हिरकणींचा, "रणरागिणी पुरस्कार २०२६" देऊन सन्मान करण्यात आला. एकता महिला मंडळाचा उपाध्यक्षा वंदना जगदाळे, सचिव शर्मिला जगताप व खजिनदार शोभा संन्याशी मंडळाच्या प्रवक्त्या सीमा कापडणे, मंडळाचा सदस्य प्रतिभा बिरारी, रेखा निकम, भारती भामरे, सुनीता गवांदे, इंदिरा खैरनार, अनिता बाविस्कर, ललिता बोरसे, कल्पना कटके, भारती महाजन, सुरेखा ब्राह्मणकर यांनी विशेष सहकार्य केले. ऍड. गीतांजली बागुल यांनी एकता महिला मंडळाचा या उपक्रमांचे कौतुक करत पुरस्कार प्राप्त सर्व समाज भगिनींचे अभिनंदन केले. मंडळाचा अध्यक्षा माया चव्हाण यांनी 'महाराष्ट्र राज्य मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप' चे अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल आभार व्यक्त केले. आपल्या समाजातील सर्व महिलांनी समाजातील गरजू भगिनींना एकत्र करून सामूहिक उद्योग व्यवसाय कसे सुरू करता येतील यासाठी एकात्मता दाखवून समाज भगिनींना सक्षम करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्री बाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे आव्हान केले. कार्यक्रमाचा शेवटी  उपस्थित सर्व मान्यवर व पुरस्कार प्राप्त रणरागिणींचे आभार मानले. व अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत