BREAKING NEWS
latest

कल्याण लोकसभा खासदार आणि कडोंमपा महापौर यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात गुरुवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या स्मारकाजवळ आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. याचसमवेत नेत्रदीपक अशी आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी यांनी महाराजांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थीत होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत