कल्याण - आजचा 'महाराष्ट्र टॉप १० न्यूज' चॅनेल चा वर्धापन दिनाच्या निमित्ताने, मानवसेवा, समाजसेवा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील समाजसेवकांचा विशेष पुरस्कार सोहळा दिनाक २२ मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य 'मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप'चे प्रमुख व रस्ता सुरक्षा अभियान चे विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) आदिवासी भागातील सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरातील परिवर्धा येथील श्री. रतिलाल रामदास शिंपी व लीलाबाई रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी हल्ली मुक्काम: आंबिवली (कल्याण) यांचाकडून सुरू असलेल्या समाजसेवेचा व मानवसेवेचा कार्याची दखल घेऊन आजचा 'महाराष्ट्र टॉप १० न्यूज' चॅनेल चे संपादक प्रशांत/प्रसाद गणपत मोरे यांनी घेतली असून दिनाक २२ मार्च रोजी रायगड जिल्ह्यतील रोहा येथे चॅनलच्या वर्धापन दिनाचा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी यांना "महाराष्ट्र समाज भूषण" पुरस्कार देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
डॉ. मनिलाल शिंपी यांच्या कार्याचा गौरव आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे, त्यांचा संकल्पनेनुसार आम्ही खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहोत अशी माहिती 'दैनिक स्वराज्य तोरण' चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील व 'चंद्रानंद कृषी पणन' संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, समाजसेवक उद्योजक डॉ. रामचंद्र देसले, भाजपा व्यापारी असोसिएशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.यशवंत(भाऊ) सोरे, समाज सेवक उद्योजक डॉ.किशोर अढळकर, यांनी विशेष माहिती दिली. राजस्थान नामदेव समाजाचे सचिव नटवर वर्मा, कल्याण शिंपी आमचे सचिव, अरविंद शिंपी, प्रविण भांडारकर, गणेश साळवे, किशोर बागुल, मनोहर सोनवणे, पोलिस पाटील सोमनाथ ठाकरे, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेश ठक्कर, रोटी डे ग्रुप चे नितील चंदेया, निलेश शहा, महिला फाऊंडेशनचा रश्मी शर्मा, 'लेडीज एक्सप्रेस' च्या मधुबेन ठक्कर, इच्छामणी भजनी मंडळाच्या अध्यक्षा, खजिनदार सचिव, परिवर्धा येथील आरोग्य सेवक, प्रसिद्ध डॉक्टर किशोर आमोदकर यांच्यासह सर्व मित्र मंडळी कडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा