BREAKING NEWS
latest

केडीएमसीच्या 'स्थायी समिती' सभापती पदी शिवसेना- भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, तर 'शिक्षण समिती' सभापती पदी अभिजीत थरवळ आणि 'महिला व बाल कल्याण समिती'च्या सभापती पदी सारिका जाधव यांची निवड जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. ६ एप्रिल – कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या 'स्थायी समिती' सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, तर 'पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती'च्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे अभिजीत सुजाता सदानंद थरवळ आणि 'महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समिती'च्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या सारिका सतीश जाधव या उमेदवारांनी दि.०२ एप्रिल २०२६  रोजी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांचेकडे दाखल केली होती. या तीनही समितींच्या सभापती पदासाठी केवळ एक-एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने, आज रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेमध्ये मल्लेश शिवन्न शेट्टी यांस 'स्थायी समिती' सभापती म्हणून, तर अभिजीत सुजाता सदानंद थरवळ यांस 'शिक्षण समिती' सभापती म्हणून आणि सारिका सतीश जाधव यांस 'महिला व बाल कल्याण समिती'च्या सभापती म्हणून घोषित करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण, संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते. आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका पदाधिकारी, इतर मान्यवर तसेच पालिका सदस्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत