BREAKING NEWS
latest

मंत्री रविंद्र चव्हाण यांना डोंबिवलीतील पुरोहित मंडळींनी दिला जाहिर पाठिंबा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासद यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना आपला संपूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच "आपण प्रचंड मताधिक्याने निवडून याल" असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यासोबतच "पुढील सामाजिक कार्यासाठी जय, यश, बल लाभो" असे आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. या शुभाशीर्वादांमुळे निवडणूक लढवण्यासाठी शंभर हत्तींचं बळ मिळालं अशी प्रांजळ प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी पुरोहित मंडळाचे अध्यक्ष वेदमूर्ती अमोल विजय कुलकर्णी, संतोष पुराणिक, कोदंडपाणी कुलकर्णी,  लक्ष्मण पारेकर, केदार पारेकर, राहुल शुक्ल,  महेश जोशी, दिनेश उपासनी, श्री. यज्ञेश जोशी,  कपिल भंडारी, सार्थक आराध्ये, श्रीपाद कुलकर्णी आणि श्री कुलकर्णी आदी सभासद उपस्थित होते.  

डोंबिवलीत कमळच फुलणार !

शहरातील रामनगर येथील विविध संस्था आणि सोसायटी यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रामनगर मधील राजस्थान जैन संघ हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये श्री राजस्थान जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, लोहाणा समाज, यादव समाज, बिलावल असोसिएशन, युवा आशापुरा मंडल इ. संस्था यांचा सहभाग होता. 

त्या बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधला तसेच त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. त्या बैठकीदरम्यान सी.ए. जय जैन आणि ऍड. रोहन देसाई या युवकांचे सत्कार केले. त्यावेळी सर्व उपस्थितांनी डोंबिवलीत कमळच फुलणार असल्याचे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला.  

या बैठकीला माजी नगरसेवक भाई देसाई, मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, माजी अध्यक्ष गिरीश साठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहिर देसाई, आशिष मौर्य, सिद्धांत घुले, सुनील वेताळ, स्वानंद भणगे आदी भाजपा पदाधिकारी तसेच किरण राजजी राणावत, प्रमोद ठक्कर, राजबहादूर यादव, लल्लन यादव, तगदराज राणावत, भावेश जैन, प्रदीप जैन, दिलीप कोठारी, सुखलाल जैन, तेजराज जैन आदी प्रमुख संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

विकास म्हात्रे हे दिलेला शब्द जपणारा माझा मित्र - मंत्री रवींद्र चव्हाण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : शहरातील सिद्धार्थ नगर, कुंभारखाण पाडा, गरिबाचा वाडा या विभागातील नागरिकांचा मेळावा संपन्न झाला. माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माझे मित्र विकास म्हात्रे हे दिलेला शब्द पाळणारा मित्र अशा शब्दात त्यांचे कौतुक केले.
    
शहरात माझे अनेक भूमिपुत्र मान्यवर व्यक्तींशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. राजकारणाच्याही आधी आमची मैत्री आहे. ती सगळ्यांनीच कायम ठेवत मैत्रीला प्राधान्य देऊन एकूणच सगळेच माझ्याशी अत्यंत प्रेम, आपुलकीने आहेत. हक्काने आवाज देणारी मित्रमंडळी माझ्या अवतीभोवती असल्याची मला नेहमी जाण आहे.
विकास म्हात्रे आणि त्यांचे कुटुंबीय हे त्यापैकी एक कुटुंब आहे हे सर्वश्रुत आहे. त्या मेळाव्यात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवारण केले. यावेळी सर्व उपस्थितांनी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर विकास म्हात्रेंसह, राष्ट्रवादी डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : निवडणूक आयोगाने महासंचालकपदी असलेल्या रश्मी शुक्ला यांची नुकतीच बदली केली होती. त्यांच्या जागी आता महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड झाली आहे. सध्या ते डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला यांनी निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे संजय वर्मा तात्काळ पदभर स्वीकारतील, अशी माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेस नेते नाना पटोलेंसह विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक
प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली होती.

यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची सातत्याने चर्चा रंगली होती. अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचा डिजिटल घोषणापत्र: फक्त एक संदेश आणि तपशील मिळवा!

सर्वसामान्यांना आता घोषणापत्राचे तपशील थेट मोबाइलवर

बारामतीत आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी 'महा राष्ट्रवादी घोषणापत्र' लाँच केले. या अभिनव उपक्रमात नागरिकांना 9861717171 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर फक्त एक संदेश पाठवून राष्ट्रवादीचे घोषणापत्र वाचनाची संधी मिळणार आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून नागरिकांना कॉल करण्याची गरज नाही. फक्त संदेश पाठविला तरी आपोआप दोन भाषांमध्ये – हिंदी व मराठी – घोषणापत्राची सर्व माहिती मिळेल.

या वेळी पक्षाने विधानसभा मतदारसंघांनुसार स्वतंत्र घोषणापत्रदेखील सादर केले. मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि गोंदियामध्ये कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते घोषणापत्र अनावरण झाले.