BREAKING NEWS
latest

नेक्सस सीवूडमधील महाराष्ट्रातील सर्वात मोठी 'क्युबॉईड ऍनामॉर्फिक स्क्रीन इन-मॉल ऍडव्हर्टायझिंग' मध्ये घडविणार क्रांती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी मुंबई : भारतातील पहिली सूचिबद्ध रिटेल आरईआयटी असलेल्या नेक्सस सिलेक्ट ट्रस्टच्या नेक्सस सीवूड्स या प्रीमिअर प्रॉपर्टीमध्ये आयाम या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्युबॉइड ऍनामॉर्फिक स्क्रीन अनावरण करण्यात आले आहे. आयाम म्हणजे मिति, आणि नेक्सस सीवूड आणि एसऍण्डओ इन्व्हेस्टमेंट इन-मॉल ऍडव्हर्टायझिंगची मिति बदलण्यास सज्ज झाले आहेत. अशा प्रकारची अत्याधुनिक थ्रीडी स्क्रीन असलेला हा महाराष्ट्रातील पहिला मॉल ठरला आहे आणि ग्राहकांवर कायमस्वरुपी ठसा उमटिवणारा इमर्सिव्ह, खिळवून ठेवणारा कंटेन्ट तयार करण्यासाठी ब्रँड्सना अतुलनीय संधी लाभली आहे.

आयाम स्क्रीन ही मॉलच्या सेंट्रल ऍट्रिअम या मध्यवर्ती ठिकाणी असून या स्क्रीनमुळे ३६० अंशांचा डिस्टॉर्शन-फ्री व्हिज्युअल अनुभव मिळतो. १५ फुट रुंद व ९ फुट उंच क्युबॉइडमुळे ऍडव्हर्टायझिंग एका नव्या उंचीवर पोहोचेल. या माध्यमातून ब्रँड्सना त्यांची उत्पादने लाँच करण्यासाठी, प्रमोशनसाठी, इंटरॅक्टिव्ह कॅम्पेनसाठी आकर्षक व सखोल ब्रँड रिकॉल देणारे शक्तिशाली साधन उपलब्ध झाले आहे. 

थ्रीडी स्क्रीन एका उंचीवर बसविली आहे, मॉलमध्ये येणारे अभ्यागत थ्रीडी चष्म्यांशिवाय या व्हिज्युअल्सचा आनंद घेऊ शकतात

जमिनीपासून अनेक फुटांवर हा क्युबॉइड बसविलेला असून तो चारही बाजूंनी पाहता येऊ शकतो. आयाम स्थिर राहील याची अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून पूर्ण काळजी घेण्यात आली आहे आणि खरेदीदार व ब्रँड पार्टनरसाठी स्तिमित करणारा अनुभव निर्माण करण्याच्या दृष्टीने आयाम डिझाईन करण्यात आला आहे.
नेक्सस सिलेक्ट मॉल्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर निशांक जोशी यांच्या म्हणण्यानुसार, "नेक्ससमध्ये आम्ही रिटेल अनुभवांमध्ये इनोव्हेशन सादर करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आयाम हे कथाकथनाच्या भविष्याचे प्रतिनीधित्व करते. एक अविस्मरणीय व वैशिष्ट्यपूर्ण मार्गाने आपल्या ऑडियन्ससोबत संवाद साधण्यास व्यवसायांना आयाम सक्षम करते. अत्याधुनिक तंत्रज्ञान व कल्पक शक्यता यांची सांगड घालून आम्ही रिटेलमध्ये एक नवा मापदंड निश्चित करत आहोत आणि ब्रँड्स त्यांच्या टारगेट कन्झ्युमर्सवर उत्कृष्ट छाप सोडते."

या डायनामिक ऍनामॉर्फिक स्क्रीनमुळे ब्रँड्सना नवी मुंबईतील वाढत्या व वैविध्यपूर्ण लोकसंख्येशी जोडून घेण्यासाठी इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. आयाममुळे ब्रँड्सना लक्ष वेधून घेण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे आणि त्यांचा संदेश अत्यंत इनोव्हेटिव्ह फॉरमॅटमध्ये देऊ शकतात, जेणेकरून त्यांचे अस्तित्व आजच्या टेक-सॅव्ही व अनुभव घेण्यास इच्छुक असलेल्या खरेदीदारांशी सुसंगत असेल.

एसऍण्डओ इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक संज्योत वैद्य म्हणाले, "आयाम या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्युबॉइडच्या लाँचच्या निमित्ताने नेक्स सीवूड्ससोबत भागीदारी करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. मॉल-ॲडव्हर्टायझिंग च्या जगात हे सहयोग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयाममुळे ऍडव्हर्टायझिंगच्या अनुभवात अमूलाग्र बदल घडून येईल, अशी इनोव्हेटिव्ह आउट-ऑफ-होम उपाययोजना तयार करण्यासाठी समर्पित आमच्या स्पेशलाईझ्ड मॉल डिव्हिजनला खात्री आहे. यामुळे ब्रँड्सना सतत बदलणाऱ्या ग्राहकांशी अनोख्या व भविष्यवेधी पद्धतीने संवाद साधण्याची अतुलनीय संधी मिळेल."

हे ग्राउंडब्रेकिंग मानक निश्चित करून 'नेक्स सीवूड मॉल'ने रिटेल वातावरणात सुधारणा केली आहे, त्याचसोबत ब्रँडना ग्राहकांशी जोडून देण्याच्या पद्धतीत अमूलाग्र बदल घडवला आहे. त्यामुळे रिटेल ऍडव्हर्टायझिंग इनोव्हेशनमध्ये त्यांनी जागतिक पातळीवरील लीडर म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. या गेमचेंजिंग व्हिज्युअल स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येक ब्रँडचा अनुभव अधिक समृद्ध होतो आणि या वेगाने बदलणाऱ्या मार्केटमध्ये व्यवसायांना उठून दिसण्यासाठी मदत होते.

नव्या सरकारसमोर जलद महाराष्ट्रासाठी या प्रकल्पांचे आव्हान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. तसेच सत्ता स्थापन झाल्यानंतर नव्या महायुती सरकारसमोर अनेक प्रकल्पांचे आव्हानं देखील असणार आहे. जलद महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्याचे नव्या सरकारपुढे आव्हान असणार आहे. तसेच त्यामध्ये अनेक प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असल्याचे दिसत आहे. 

राज्यात नुकतेच बहुमतांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांचा शपथविधी सोहळा ५ सप्टेंबरला पार पडणार आहे. त्यानंतर राज्याच्या पुढच्या कामकाजाला जोरदार सुरुवात होणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. तसेच राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणायची असेल तर दळणवळणाच्या पायाभूत सुविधांचे जाळे उत्तम असणे आवश्यक असते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. मात्र असे अनेक मोठे प्रकल्प वेगाने राज्यात राबवण्याची गरज आहे.

मुंबई मधील वांद्रे ते विरार कोस्टल रोड किंवा विरार-अलिबाग कॉरिडॉर असू देत. तसेच मुंबई-गोवा महामार्ग किंवा पुणे-बंगळुरू एक्स्प्रेस-वे असू देत. तसेच पुण्याचा रिंग रोड प्रकल्प किंवा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग असो. असे अनेक प्रकल्प लवकरात लवकर जनतेच्या सेवेत येण्याची गरज आहे. त्यामुळे मेट्रो शहरांचा विचार केला असता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगाने सुधारण्याची गरज आहे. मुंबईत अनेक मार्गांची कामे ही अतिशय हळुवार पद्धतीने सुरू आहेत. कारण जोपर्यंत ही मेट्रो मार्ग खुले होत नाही तोपर्यंत मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार नाही. त्यामुळे नवीन सरकारमध्ये शहर विकास, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी अशी अनेक खाती अतिशय कार्यक्षम आणि दूरदृष्टी लाभलेल्या नेत्यांकडे देण्यात येण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याला आजच्या गरजा भागवायच्याच आहेत, मात्र उद्याचा जलद महाराष्ट्र देखील घडवण्यासाठी पायाभरणी करायची आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक घेणारा ठाणे जिल्हा राज्यात पहिला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
ठाणे : बदलापूर येथील शालेय अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्ह्यातील शाळांनी बालकांच्या संरक्षणासाठी कोणत्या खबरदारी घेतल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशाने व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. 

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्याअन्वये बालकांच्या सुरक्षिततेबाबत नियमावली बनवली असून त्या अनुषंगाने शासन निर्णय पारीत केला आहे. ही नियमावली केवळ कागदावरच राहू नये,त्याची अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने न्यायाधीश तथा सचिव ईश्वर सूर्यवंशी, मुख्य न्याय दंडाधिकारी एस. के. फोकमारे, ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, पोलीस गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजकुमार डोंगरे, सरकारी वकील संजय मोरे आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, संस्था प्रतिनिधी आणि मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी यांच्यासह आढावा बैठक घेण्यात आली. या विषयाबाबत बैठक घेणारा ठाणे जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

बालसुधारगृहांमधील बाल आरोपींमध्ये पोस्कोच्या गुन्ह्यातील बालकांची संख्या लक्षणीय आहे. हे चिंताजनक चित्र बदलायचे असेल तर ते शिक्षकच बदलू शकतात. मोबाईलच्या माध्यमातून पॉर्न संस्कृतीत गुंतत चाललेल्या बालकांना तेच यातून बाहेर काढू शकतात, असा विश्वास ठाणे न्यायालयाचे मुख्य न्याय दंडाधिकारी एस.के. फोकमारे यांनी व्यक्त केला.

ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये आता बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजकुमार डोंगरे यांनी सांगितले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ईश्वर सूर्यवंशी यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या शिक्षण अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून शालेय सुरक्षेचा आढावा घेतला.त्याचबरोबर या आढाव्यात शाळेशी निगडीत सर्व लोकांना कायदे व बालकांच्या हक्कांचे संरक्षण याविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याचे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे, बालकांच्या संबंधी निवासी व अनिवासी संस्थांमध्ये पोलीस विभागाकडून पर्यवेक्षण होणे आवश्यक आहे, शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही व त्यांचे एक महिनाभराचे बॅकअप जतन असणे गरजेचे आहे, शालेय स्टाफला व मुलांना सायबर गुन्ह्यांबाबत सावधगिरीचे प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच शाळांमध्ये पायाभूत सुविधा दिल्या जातात की नाही यावर शासकीय शालेय विभागाचा अंकुश हवा, तसेच प्रत्येक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना "गुड टच, बॅड टच" बाबत प्रशिक्षण देण्याचे गरजेचे आहे व यासाठी सामाजिक संस्थांची देखील मदत घेण्याचे आवाहन केले. 

त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचले की नाही याची खातरजमा करणे गरजेचे आहे,याचबरोबर संबंधित शैक्षणिक विभाग यांनी वारंवार शाळांना भेट देवून शासन निर्णयाची अंमलबजावणी होते किंवा नाही याची पडताळणी करून अहवाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करण्याचे निर्देश श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी दिले.

यावेळी ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्हींचे प्रशिक्षण शिबिर घेणे अत्यावश्यक असून या विषयासंदर्भात कोणालाही काहीही मदत अथवा मार्गदर्शन हवे असल्यास महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधण्याबाबत आवाहन केले.

महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी केली कल्याण मधील महापालिकेच्या मराठी शाळांची पाहणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड  यांनी आज महानगरपालिकेच्या मनपा शाळा क्रमांक ३३ धाकटे शहाड, शाळा क्रमांक ६३ मिलिंद नगर, शाळा क्रमांक ६८ बारावे या तीन शाळांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान शाळा इमारत, वर्ग खोल्या, दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा तसेच शाळा परिसर यांची त्यांनी पाहणी केली आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी वर्ग सुरू असताना संवाद साधला. शाळेसंदर्भातील बाबी म्हणजे विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, शैक्षणिक सुविधा पुरविणे, शाळा इमारत सुसज्ज करणे याबाबत संबंधित अधिकारी व अभियंता यांना त्यांनी सूचना दिल्या, त्याचप्रमाणे विनापरवानगी रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करण्याबाबत व वेळेत शाळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, तसेच वेळप्रसंगी निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्त इंदु राणी जाखड यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी  विजय सरकटे तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.