BREAKING NEWS
latest

डोंबिवली जिमखाना येथे सुरू झालेल्या 'उत्सव २०२४' चा उदघाटन सोहळा दिमाखात संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली जिमखाना येथे दिनांक २१ ते २९ दरम्यान २७ व्या वर्षात पदार्पण करत सुरू होत असलेल्या 'उत्सव २०२४' चे उद्घाटन 'महाराष्ट्र टाईम्स'चे निवासी संपादक श्री. समीर कर्वे यांच्यासह डोंबिवली जिमखानाचे अध्यक्ष दिलीप भोईर, सचिव पर्णाद मोकाशी, खजिनदार आनंद डिचोलकर, सुवर्णा वाघ आणि सर्व जिमखाना सदस्य आणि तमाम डोंबिवलीकरांच्या साक्षीने शानदार उद्घाटन सोहळा पार पडला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे, हे सर्वजण विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त असल्या कारणाने या उत्सव उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. डोंबिवलीकरांचे लाडके आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपले डोंबिवलीवरचे प्रेम कायम ठेवत डोंबिवली जिमखाना 'उत्सव २०२४' ला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या.
डोंबिवली जिमखाना उत्सव चे ब्रीदवाक्य 'सर्वांसाठी सर्वकाही'

याच उद्देशाने या उत्सव यात्रेत उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी अनेक प्रकारचे स्टॉल, मनोरंजन, क्रीडा, खाद्य जत्रा, बँका आणि रियल इस्टेट त्याचप्रमाणे बाळ गोपाळ यांच्या स्पर्धा मनोरंजन अगदी लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांसाठी सर्वकाही असणाऱ्या जिमखाना उत्सव यात्रेत डोंबिवली कल्याण आणि ग्रामीण भागातून एवढेच ठाणे मुंबई येथून सुद्धा अनेक उत्सव प्रेमी या डोंबिवली जिमखानाच्या उत्सवाला आपली हजेरी लावत असतात आणि काही ना काही वस्तू घेऊन जात असतात आणि तोच आनंद वर्षभर आपल्या गाठीशी साठवून पुढल्या वर्षाची वाट पाहत असतात असा हा सर्वांनाच हवा असणारा डोंबिवली जिमखाना उत्सव संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी जिमखानाचे सर्व सदस्य, पोलीस, अग्निशामक दल तसेच ऍम्बुलन्स सेवा सज्ज असतात.

शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी व सामाजिक बळकटीकरणासाठी तृतीयपंथीयांना शक्यतोपरी मदत करु ! - महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी व सामाजिक बळकटीकरणासाठी तृतीय पंथीयांना शक्यतोपरी मदत करु असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी केले. काल सायंकाळी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे दालनात तृतीय पंथीय समुदायाच्या प्रतिनिधीनींसमवेत आयोजिलेल्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले.

शासनाने तृतीय पंथीयांसाठी धोरण जाहिर केले असून महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या पुढाकाराने समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आयुक्त दालनात तृतीय पंथीयांच्या प्रतिनिधींची काल सायंकाळी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महापालिकेच्या उपायुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ला, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, तृतीय पंथीयांच्या जिल्हा आयकॉन व किन्नर अस्मिता संस्थेच्या अध्यक्षा निता केणे व त्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत आयुक्तांनी तृतीय पंथीयांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या. तृतीय पंथीयांना आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यासाठी मदत करावी अशी विनंती तृतीय पंथीयांमार्फत करण्यात आली. त्यावेळी लाईट हाऊच्या माध्यमातून तृतीय पंथीयांना प्रशिक्षण दिले जाईल त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांना महापालिकेमार्फत शक्य तितकी मदत केली जाईल तसेच आधारकार्डाअभावी तृतीय पंथीय शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित रहात असल्यामुळे त्यांना आधारकार्ड बनवून देण्यास महापालिकेतर्फे सहकार्य केले जाईल अश्या शब्दात आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आश्वासित केल्यामुळे तृतीय पंथीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुललेले दिसून आले. निवडणूक कालावधीत तृतीय पंथीयांना महापालिकेमार्फत निवडणूक कार्ड (वोटर आयडी) वितरीत करण्यात आले होते. त्याबाबत तृतीय पंथीयांनी आयुक्त महोदयांचे आभार मानले.

महाराष्ट्र शासनाच्या तृतीय पंथीय धोरणाच्या अंमलबजावणीस प्रथम: महापालिकेतर्फे प्रारंभ करण्यात आला असून तृतीय पंथीयांसाठी लवकरच किन्नर महोत्सवाचे आयोजन महापालिकेच्या नाटयगृहात करण्यात येईल अशी ‍माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी या बैठकीत दिली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात “अल्पसंख्याक हक्क दिवस” उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१८: संयुक्त राष्ट्राने दि.१८ डिसेंबर १९९३ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तुत केला आहे. त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे तसेच या बाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी, यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनूसार या दिवसाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी श्री.वैभव कुलकर्णी यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्व समजावून सांगितले. 
    
या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.भरत साळुंखे, मानव विकास विभागाचे अधिकारी श्रीमती दिपाली भोये, लेखा अधिकारी श्रीमती स्मिता नि. पट्टेकर, अल्पसंख्याक कक्षातील सांख्यिकी सहायक श्री. सुनिल नाडेकर, महसूल सहायक श्रीमती शितल जाधव व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

अग्निशस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक, ठाणे शहर यांनी ₹. २१,९७,६११ मुद्देमाल हस्तगत करत केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : राबोडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०५/१२/२४ रोजी २३:३० वाजण्याच्या  सुमारास फिर्यादी श्रीमती.सुनिता सिल्वराज पिल्ले (वय: ४५ वर्षे) राहणार. उल्हासनगर-४ या मुंबई येथे जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून नाशिक-मुंबई हायवे मुंबई लेनवरील कॅडबरी जंक्शनजवळील ब्रीजच्या चढणीवर ठाणे पश्चिम येथे आल्या असताना त्यांची कॅब कार अडवुन त्यांना 'पुलिस और कस्टम पीछेसे आ रहे, आप गाडी रोको' अशी बतावणी करून, तसेच कॅब चालकाला 'आप गाडी बंद करे' असे धमकावुन, कॅब थांबावुन, आरोपी इसमांनी फिर्यादीच्या डाव्या बाजुचा दरवाजा जबरदस्तीने उघडून, फिर्यादी प्रतिकार करत असतानाही त्यांनी फिर्यादीच्या सीटवरील दोन बॅग त्यामध्ये ५०,०००/- सौदी रियाल (भारतीय चलनातील ११,२९,०००/- रूपये) व भारतीय चलनातील १ लाख रूपये असे एकुण १२ लाख २९ हजार रूपये जबरीने चोरून पळुन गेले म्हणुन राबोडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं ९४९ /२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३०९(६), ३(५), ४९, सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३,२५,सह म.पो.का.कलम ३७(१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यांच्या  सुचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथकाकडुन विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास राबोडी पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथक असे एकत्रितपणे चालु होता. सदर गुन्ह्यातील आरोपीं बाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना तांत्रिक विष्लेषणाव्दारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपुर्व आरोपींचा तपास करून आरोपी १) मोहीत हेमंत हिंदुजा (वय: १९ वर्षे), राहणार, उल्हासनगर-३, जि. ठाणे, २) वरूण नरेश होटवानी, (वय: २० वर्षे) राहणार उल्हासनगर-३, जि. ठाणे, ३) रोहन सतिश रेडकर उर्फ बाबु (वय: १९ वर्षे) राहणार उल्हासनगर-३, जि. ठाणे. ४) स्वप्नील दिलीप ससाणे उर्फ बाबुराव (वय: २२ वर्षे), धंदा: बेकार, राहणार बॅरेक नं. ३०, रूम नं.२, जयलक्ष्मी सोसायटी समोर, एसईएस शाळेचे पाठीमागे, उल्हासनगर-१, जि. ठाणे. ५) अन्वर सुबानी शेख, उल्हासनगर-१, जि. ठाणे व महीला आरोपी ६) निता विष्णु मनुजा उर्फ भक्ती (वय: ४० वर्षे), कल्याण (प) जि.ठाणे व ७) विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडुन दरोडा टाकुन जबरी चोरी केलेली रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहन मारूती कंपनीची इर्टिगा कार, होन्डा शाईन, सुझुकि कंपनीची एक्सेस
मोटारसायकल, २० मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले अग्निशस्त्र गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस व मोबाईल फोन असा एकुण २१,९७,६११/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांची दि. १९/१२/२०२४ रोजी पर्यंत रिमांड पोलीस कोठडी आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. पंजाबराव उगले, मा.पोलीस उप-आयुक्त श्री. अमरसिंह जाधव, मा.सहा. पोलीस आयुक्त शोध-१ (गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री.शेखर बागडे, मा.सहा.पोलीस आयुक्त शोध-२ (गुन्हे) श्री. राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नरेंद्र पवार, सपोनिरी. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भुषण कापडणीस, पोउपनिरी. विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, सपोउनि. संजय बाबर, संदिप भोसले, पोहवा. दिपक गडगे, आशिष ठाकुर, संजय राठोड, सचिन शिंपी, योगीराज कानडे, अभिजीत गायकवाड, मपोहवा. शितल पावसकर, पोना. रविंद्र हासे, पोशि. अरविंद शेजवळ, तानाजी पाटील, संतोष वायकर, मपोशि. मयुरी भोसले, चापोना. भगवान हिवरे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

भिवंडीत १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या अखेर जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी -  भिवंडी तालुक्यातील मौजे लोनाड गावाच्या हद्दीतील शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील नाल्या मध्ये बिबट्या अडकून पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर पडघा पोलीस व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते. बिबट्या ला जेरबंद करणे कठीण असल्याचे निदर्शनास येताच मुंबई बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यु पथकास दुपारी बिबट्याला पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले. ज्या ठिकाणी बिबट्या अडकून पडला होता ती जागा अरुंद बोळ असल्याने या बोळात क्रेनच्या सहाय्याने पिंजरा ठेवून दुसऱ्या बाजूने दिवाळीतील फटाक्याचे बॉम्ब फोडून मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वन विभागाचे कर्मचाऱ्यांना यश मिळाले. 
त्या नंतर पिंजरा क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून बिबट्यास रेसक्यू पथकाच्या रुग्णवाहिकेत टाकून बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात घेऊन गेले आहेत. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पडघा वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.