BREAKING NEWS
latest

जेव्हीएलआर रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये बाधित होणारे समर्थनगर येथील उदंचन केंद्र मनपा स्थलांतरीत करणार

विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांना मनपाने लेखी पत्राद्वारे केले सुचित
शिवटेकडी , जोगेश्‍वरी (पूर्व) येथील रहिवाशांना येथून करण्यात येतो पाणी पुरवठा
हे काम पूर्ण झाल्यावर येथील पाण्याच्या प्रेशरमध्ये वाढ होणार

मुंबई: जोगेश्‍वरी विक्रोळी जोड (लिंक) रस्त्याच्या रुंदीकरणाचा काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी समर्थनगर येथील नाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणाचे व पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येत असल्याने सद्यस्थितीतील उदंचन केंद्र बाधित होणार असून ते मनपाकडून स्थलांतरीत करण्यात येत असल्याची मुंबई महानगरपालिकेने लेखी पत्राद्वारे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांना कळवले आहे. या उदंचन केंद्रातून शिवटेकडी, जोगेश्‍वरी (पूर्व), जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यात येतो. 
या उदंचन केंद्राला पाण्याच्या दोन मुख्य एक ३०० एमएम व दुसरी २५० एमएमची पाईपलाईन जोडण्यात आली आहे. परंतु येथील जोड रस्त्याच्या कामाच्या रुंदीकरणामुळ येथील पुलाचे रुंदीकरण व पुनर्बांधणीचे काम सुरू होत असल्याने हे उदंचन केंद्र अन्यत्र स्थलांतरीत करावे लागत आहे. त्यामुळे मुंबई महानगपालिकेने मेसर्स योगेश कनस्ट्रक्शन या कंत्राटदाराची नेमणुकही केली आहे. या उदंचन केंद्रातून शिवटेकडी परिसराला पाणी पुरवठा करण्यात येतो. हे उदंचन केंद्र प्रस्तावित ठिकाणी स्थलांतर करण्याकरीता फाऊंडेशन स्लॅब बांधणी करण्याचे काम सुरू करण्यात येत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर कार्यकारी अभियंता विभागामार्फत नविन उदंचन केंद्र स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता (जलकामे, के/पूर्व) यांनी आमदार रविंद्र वायकर यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर येथील पाण्याच्या प्रेशरमध्ये वाढ होणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत