BREAKING NEWS
latest

घरगुती एलपीजी सिलेंडरला ‘क्यूआर’ कोड लागणार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  तंत्रज्ञानाच्या झालेल्या विकासामुळे हल्लीच्या दैनंदिन जीवनात नवनवीन गोष्टीत बदल होत असलेले दिसताना, याचा अन्य फायदा बघता जनतेत जागरूकता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हल्ली डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे आर्थिक व्यवहार करताना मोठी मदत मिळत असून ग्राहकांना सेवा देताना सेवा वस्तूंबाबत पुरेशी माहिती देणे गरजेचे असते. नेमक्या याच मुद्द्याला स्पर्श करताना, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरवर आता 'क्यूआर कोड' लावण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी तीन महिन्याच्या कालावधीत याबाबत प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे समजते.

  सरकारच्या या नव्या निर्णयाचा फायदा बघता, एलपीजी सिलेंडर देण्यात येणाऱ्या 'क्यूआर कोड' ला स्कॅन करत ग्राहकांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे जसे की, सिलेंडरचा नेमका डिस्ट्रिब्युटर कोण आहे, तुम्हाला प्राप्त झालेले सिलेंडर कुठल्या प्लांटवर भरण्यात आले आहे. नेमके सिलेंडर कुठून आणण्यात आले आहे, डिलिवरी करणारी व्यक्ती कोण होती इत्यादी. सिलेंडर वर उपलब्ध असलेला 'क्यूआर कोड' स्कॅन केल्यास एकूण वजन आणि वैधता इत्यादींची माहिती देखील तपासता येणार आहे.

  इथे या नवीन पध्द्तीचा सर्वात महत्वाचा फायदा सिलेंडरची होणारी चोरी, साठेबाजी इत्यादींवर आळा घालण्यासाठी होणार आहे. 'क्यूआर कोड' हे सिलेंडर वर लावण्यात आल्यानंतर ते सिलेंडर साठी आधार कार्डच्या रूपात कार्य करणार आहे. ज्याद्वारे सिलेंडरची ट्रॅकिंग देखील करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या नवीन पद्धतीचे अन्य महत्वपूर्ण फायदे असून, ही प्रणाली लागू झाल्यावर याबाबतीत संपूर्ण माहिती पुढे येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एलपीजी सिलेंडर बाबतीत घेण्यात आलेला हा निर्णय मोठा बदल म्हणून सिद्ध होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत