प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अस्थीरोगतज्ज्ञ डॉ.सर्वेश शाहू सावंत यांच्या 'सावंत हॉस्पिटल' चा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. उपस्थित पत्रकारांनी डॉ.सर्वेश यांना त्यांच्या हॉस्पिटल मधील नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये काय व कोणती असा प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की नक्कीच, आजच आपल्या हॉस्पिटल चा शुभारंभ केंद्रीयमंत्री नारायणराव राणे साहेबांच्या हस्ते झाला आहे, आणि जसे नारायणराव राणे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांची डोंबिवलीशी जुनी ओळख, जुनी नाळ जुडलेली आहे ती म्हणजे सर्वथा प्रथम माझे वडील कैलासवासी शाहू सावंत साहेबांमुळे आणि आपल्या डोंबिवलीतली जेव्हढी पण मालवणी कोकणी वर्ग आहे त्यांच्या सगळ्यांवरती ते प्रेम करणारे आणि आहेत म्हणून होतं, आणि त्यांनी आपल्या मी दिलेल्या मी विचारलेल्या किंवा सांगितलेल्या शब्दाचा मान ठेवला आणि एव्हढ्या लांबून माझ्या हॉस्पिटलच्या शुभारंभ करण्यासाठी आले हे मी खरंच माझ्या भाग्याचं समजतो व मी खरोखरंच भाग्यवान आहे असे डॉ.सर्वेश बोलले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifbhXE5r3yJEu0SWg5EytLIktzc0utLojm9YV7CTJzzvcwIUKJsvx1Lngoc0QAl7xpl_07C526sYPDfhqdOb6KjYK08t12GqHnhO9eF0jz2CHr23iEjVQyoISsYr26j7bUBwVKc045w3cG3ggtU41YfUM1KVQZ0tP9Fe2kGraeQiL5rJ3yjV3ZSbSB7A/s320-rw/WhatsApp%20Image%202022-11-19%20at%203.jpg)
पत्रकारांनी त्यांच्या हॉस्पिटल च्या वैशिष्टयाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की हॉस्पिटल हे थोडं आधुनिकरित्या बनवलं असून आजपर्यंत बरीच हॉस्पिटल जशी शक्यतो सगळी सामान्य सेवा पुरवतात त्या सर्वत्र व सर्वच हॉस्पिटल मध्ये सारख्याच असतात. तसं सावंत हॉस्पिटलमधील इंटिरिअर व त्याचा फील आहे तो आपण सर्वसाधारण हॉस्पिटल सारखा ठेवला नसून थोडा वेगळा काही ठेवला आहे की इथे उपचारा करिता आलेल्या रुग्णांना इथे उपचार घेत असताना थोडासा वेगळेपणा वाटावा त्यांना ताजेतवाने असल्यासारखे वाटावे व त्यांनी इथून उपचार घेऊन घरी परतताना त्यांनी प्रफुल्लित, उल्हासित व पुन्हा टवटवीत असल्यासारखे जावं म्हणून त्यासाठी आपण एक वेगळं वातावरण या हॉस्पिटल मध्ये निर्माण केलं आहे. त्यात मॉडर्न टेक्नॉलॉजी मॉडर्न फॅसिलिटी आपण रुग्णांना पुरवणार आहोत.
किती तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धी हॉस्पिटलमध्ये असण्याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की जेव्हढे पण आपलया उपशाखा असतात त्या सगळ्यांचेच डॉक्टर्स आपल्याबरोबर संलग्न आहेत. तर पूर्ण वेळ मी एक अस्थीरोग तज्ज्ञ असून इथे मी आणि डॉ.निर्मल ठाकूर हे एमडी फिजिशियन असल्यामुळे पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहोत असे त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, सीमा सावंत, सर्वेश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा