BREAKING NEWS
latest

राज्यपालांच्या विधानावर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याची प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी केले आपले मत व्यक्त..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरगांबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी राज्यपालांनी बोलताना जुन्या काळातील आदर्श हे शिवाजी महाराज होते तर आजच्या काळातील आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी आहे असे म्हटले होते. प्रसंगी राज्यपालांनी शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी यांच्यासोबत केल्याने राजकीय वादंग निर्माण झाले आहे. अनेक नेत्यांनी राज्यपालांच्या विधानावर निषेध नोंदविला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी नुकतीच ‘अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा २०२२’ च्या समारोपाला पुणे येथे हजेरी लावली होती त्यावेळी राज्यपालांच्या विधानावर सूचक मत व्यक्त केले आहे.

  यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा आदर्श नाही. ते सर्वांचेच आदर्श आणि प्रेरणा आहेत. महाराजांच्या शौर्याची आणि कार्याची माहिती सर्व देशाला आहे, राज्यपालांना देखील त्यांच्याविषयी चांगली माहिती आहे. राज्यपालांच्या मनात कुठलीही शंका नाही, मात्र राज्यपालांनी केलेल्या विधानाचा विनाकारण विपर्यास करत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.” अशा प्रकारे राज्यपालांच्या विधानावर फडणवीसांनी स्पष्टीकरण देत आपले मत मांडले आहे. पोलीस बदल्यांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, जे अधिकारी बदलीस पात्र आहे त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत, बाकी बदल्या या अद्याप झाल्या नाही. सर्व बदल्या आजवर नियमांनुसार झाल्या आहेत.

एकंदरतीच राज्यभर राजकीय वर्तुळातून गेल्या दोन दिवसांपासून राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केल्याने जी खळबळ माजली होती, त्याला उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण देताना प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न दिसून आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील फडणवीसांच्या सारखेच विधान केल्याने सत्ताधारी नेत्यांकडून या प्रकरणी राज्यपालांची पाठराखण करण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचे जाणवत आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत