माझ्या बारामती दौऱ्यामुळेच अजित पवार इतके प्रभावित झाले की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले, कोण कोणाचा योग्य कार्यक्रम करणार, हे जनता २०२४ मध्ये सांगेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
एक दिवसापूर्वीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळे यांच्या बारामती दौऱ्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “एवढा मोठा ताकदीचा नेता मला आव्हान देत आहे. हे ऐकून मी घाबरलो. आमच्या सर्वांची झोप उडाली आहे. मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय. बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार २०२४ मध्ये होणाऱ्या पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा मला राजकारण सोडलेले बरे असे वाटते.” असे अजित अजित पवार प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा