BREAKING NEWS
latest

ब्रह्मकुमारी संस्थेच्या घाटकोपर विभागाचा ४७ वा वार्षिक उत्सव संपन्न..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संस्थेचा वार्षिक उत्सव नुकताच डोंबिवली येथील 'हेरिटेज हॉल' मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाची 'सूनहरा बचपन' या संकल्पनेवर रूपरेषा आखण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली व घाटकोपर उपविभागाच्या ब्रह्मकुमारी केंद्राने केला होता. गेली ४७ वर्ष अध्यातमिक कार्य ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने समाजात सुरू आहे .या वार्षिक दिनाच्या निमित्ताने राजयोगिनी ब्रह्मकुमारी डॉ.नलिनी दीदी (दीदी मां) यांचा सत्कार करुन त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यात आले. 

  या कार्यक्रमामध्ये ब्रह्मकुमारी नलिनी दीदी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाने उच्च पातळी गाठली. दीदीं मां यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले असून वयाची ६५ वर्ष त्यांनी निस्वार्थी, निर्लसपणे मानवाची सेवा आत्मियतने, काळजपूर्वक अध्यातमिक वाढीसाठी केली. डॉ नलिनी दीदी (दीदी मां) या  मुंबईतील मध्यवर्ती राजयोग केंद्राच्या संचालक आहेत. या संस्थेच्या वार्षिकोत्सव दिनी लोकप्रिय अध्यातमिक गुरू ब्रह्मकुमारी नियतकालिकेच्या स्तंभलेखिका राजयोगी ब्रह्मकुमार निकुंज यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 'जान्हवी मल्टी फाऊंडशन'चे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, वपोनि सचिन सांडभोर आणि इतर मान्यवरांचा सत्कार सदर कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घाटकोपर उपविभागाच्या सहसंचालक आणि डोंबिवली केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकू दीदी यांनी केले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत