BREAKING NEWS
latest

क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी 'जान्हवी मल्टी फाउंडेशन' तर्फे 'जनगणमन' शाळेच्या चिल्ड्रन्स स्माॅल सेविंग बँकेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.


 प्रतिनिधी: अवधुत सावंत


  डोंबिवली पश्चिमेकडील 'युनियन  बँक ऑफ इंडिया' च्या सहकार्याने  'जान्हवी मल्टी फाउंडेशन' संचालित 'जनगणनमन' शाळेच्या चिल्ड्रन स्माॅल सेविंग बँकेचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या उद्घाटनाला माजी नगरसेवक विश्वनाथ राणे 'जान्हवी मल्टी फाउंडेशन' चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव प्रेरणा कोल्हे, जान्हवी मल्टी फाउंडेशनच्या जान्हवी कोल्हे, डोंबिवली युनियन बँकेचे व्यवस्थापक अवनीश कुमार, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक वर्ग, पालक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात उपस्थित होता. 


  यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मंगल पांडे यांच्या ऐतिहासिक क्षणांचे भावनेने ओथंबून भरलेले नाट्य सादरीकरण केले. त्याला उपस्थितांकडून कडून प्रचंड  प्रतिसाद मिळाला.
लहान मुलांमध्ये विशेषता, विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता यावी. याकरिता प्रथमच 'जनगणमन' शाळेमध्ये विद्यार्थी बँक, विद्यार्थ्यांनी सुरू केलेली व विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन असलेली बँक सुरू करत असल्याबद्दल विश्वनाथ राणे आणि डॉ. कोल्हे यांनी युनियन बँकेचे आभार मानले. संचालक डॉ. राजकुमार कोल्हे यांच्या संकल्पनेतून ही बँक निर्माण झाल्याने डॉ. कोल्हे यांचे अभिनंदन आणि कौतुक राणे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या बँकेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अवनिष कुमार यांनी सांगितले.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत