BREAKING NEWS
latest

५ तोळे सोने असलेली ऑटो रिक्षात विसरलेली बॅग रिक्षावाल्याने केली परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली पश्चिम येथील प्रवासी दिपाली राजपुतय या दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास 'श्रम-साफल्य बंगला' ते डोबिवली स्टेशन मच्छीमार्केट असा प्रवास करत होत्या. रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की बँग रिक्षामध्ये राहीली आहे. त्यावेळी त्यांनी ताबडतोब रिक्षा स्टँण्डवर येऊन चौकशी केली. तेव्हा महात्मा फुले रोड रिक्षा स्टँण्डवरील रिक्षा चालक श्री.संतोष राणे, रिक्षा क्र. एमएच ०५ डीएल ४१८५ यांनी त्यांच्या रिक्षामध्ये शोध घेतला असता प्रवाशांची ५ तोळ्याचे दागिने असलेली बँग सापडली. त्यांनी ती बँग प्रवासी महिला यांना संपुर्ण दागिन्यासह प्रामाणिकपणे परत केली.

   

  या प्रामाणिकपणाबद्दल  कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मंदार धर्माधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गित्ते यांनी रिक्षा चालक श्री.संतोष राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


 

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत