BREAKING NEWS
latest

भूमिगत नाला बांधकाम प्रकरणी डोंबिवलीतील नांदिवली नाला ते स्वामी समर्थ चौक दरम्यान वाहतूकीत बदल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील डोंबिवली पूर्वमधील नांदिवली नाला ते स्वामी समर्थ चौक दरम्यान रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे व भूमिगत नाल्याचे काम टप्याटप्याने करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

वाहतूकीत बदल पुढील प्रमाणे आहे.
  
१) नांदिवली नाला येथून स्वामी समर्थ चौक - साईबाबा मंदिर  सागांव कल्याण शिळ रोडचे दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लक्ष्मीकांत रेस्टॉरंट बार समोरील प्रवेश बंद करण्यात येत आहे. यासाठी पर्यायी मार्ग असा आहे की सदरची वाहने नांदिवली नाला येथून डाव्या बाजूने वळण घेवून नांदिवली नाल्याचे समांतर रस्त्याने गांधीनगर चौक, स्वामी समर्थ मठ, पीएनटी चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील. 

२) स्वामी समर्थ चौक येथून डोंबिवली रेल्वे स्थानका कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ओम साई जम्बो वडापाव समोरील प्रवेश बंद करण्यात येत असून त्याकरिता पर्यायी मार्ग असा की सदरची वाहने स्वामी समर्थ चौक येथून उजव्या बाजूस वळण घेवून पीएनटी कॉलनी, गांधीनगर चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील असे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत