BREAKING NEWS
latest

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई तर्फे मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार कवी कुसुमाग्रज यांचा २७  फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या सोशल मीडिया युगापर्यंत मराठी परंपरेचा एक दीर्घ असा वारसा आहे. देशी आणि परदेशी भाषांचे आक्रमण होऊनही मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत असताना, जगाच्या व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि शिक्षणामुळे मराठी माणसांसमोर भविष्याविषयी चिंता व्यक्त करणारे बरेच प्रश्न सध्या उभे राहिले आहेत. ते योग्य कि अयोग्य याची चर्चा व्हावी या हेतूने वृत्तपत्र चळवळीचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या  मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने *(१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा'* या विषयावर शाखाप्रमुख संजय भगत पुरस्कृत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शब्दमर्यादा १२०० असून इच्छुकांनी युनिकोड मराठीमध्ये टाईप करून लेख <rajandesai759@gmail.com> या मेल आयडीवर पाठवावेत, रोख पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असून लेख दि. २० फेब्रुवारी पर्यंत पाठवावेत, पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर-पश्चिम येथील मराठी भाषा दिवस कार्यक्रमात होईल अशी माहिती मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी राजन देसाई - ८७७९९८३३९० यांच्याशी संपर्क साधावा.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत