BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी 'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन' या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद आयोजित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन' या संस्थेची सातवी वार्षिक जागतिक परिषद डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहात दिनांक १२  आणि १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे. ही संस्था जगभरातील ब्राह्मण व्यावसायिकांना एकमेकांशी व्यावसायिक रित्या जोडण्यासाठी कार्यरत आहे आणि त्याच माध्यमातून समाज बांधवांना नोकरी पेशातून व्यावसायिक आणि उद्योगी बनवण्यात आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देण्यात परिवर्तित करत आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी माननीय पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ संशोधक श्री. अनिलजी काकोडकर उपस्थित राहणार आहेत तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र शासन मा. श्री. रवींद्रजी चव्हाण ह्यांची पण उपस्थिती लाभणार आहे. 

  डोंबिवली येथील तसेच डोंबिवली बाहेरील सन्माननीय प्रथित यश असे उद्योगपती आणि महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेले विविध सन्माननीय व्यक्ती वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत ज्यामध्ये सर्वश्री सतीश मराठे, संजय लोंढे, दीपक घैसास, उदय निरगुडकर, संजय खरे, डॉक्टर अजय शेष, शशांक पेंडसे, निवृत्त लष्करी अधिकारी सुदर्शन हसबनीस इत्यादी मान्यवर व्यक्ती सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात प्रतिथयश व्यावसायिकांना उद्यम कौस्तुभ पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे आमंत्रण दिले गेले आहे. या परिषदेमध्ये विचार व्यवसाय आणि विकास या त्रिसूत्री वर आधारित अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, ज्यात व्यावसाय संदर्भात अनेक चर्चासत्रे, मान्यवरांचे मार्गदर्शन, ट्रेड फेअर, फॅशन शो, अशासारखे अनेक कार्यक्रम असणार आहेत व त्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आणि भारताबाहेरील देखील अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत असे बीबीएन ग्लोबल असोसिएशन या संस्थेचे सहसंचालक श्री. अरविंद कोऱ्हाळकर यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक ब्राह्मण व्यावसायिकांनी <www.parivartan23.in> ह्या वेबसाईटवर रजिस्टर करणे अथवा  7208266169 ह्या क्रमांकावर फोन करून आपली उपस्थिती निश्चित करायची आहे असे आयोजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत