BREAKING NEWS
latest

डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. डोंबिवली येथील शिवसेना मध्यवर्ती शाखे जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटी पूर्व (ए)चे अध्यक्ष सदाशिव शेलार, डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी पूर्व (बी)चे अध्यक्ष नवेंदु पाठारे, डोंबिवली शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी (ए) चे अध्यक्ष शशिकांत चौधरी, डोंबिवली शहर (ब) ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. एकनाथ म्हात्रे,  डोंबिवली शहर काँग्रेस ब्लॉक कमिटी पूर्वचे जनरल सेक्रेटरी अशोक सदू कापडणे, अभय टावरे

 जीतेंद्र मुळे, श्री रमेशचंद्र जैन तसेच डोंबिवली शहरातील सर्व नागरिकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, तसेच काँग्रेस पदाधिकारी,महिला पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, ह्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी सर्वानी हजर राहून महाराजांना मानवंदना दिली. 

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अनुसरून काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. महाराजांच्या सिद्धांताची बांधिलकी समाजासोबत होती. त्या विचारांचे काँग्रेस पक्षाचे धोरण आहे. आगामी पालिकेची  निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येतील असे काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत