BREAKING NEWS
latest

मोबाईलच्या 5G नेटवर्कमुळे भारतातील इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये ११५ टक्के वाढ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  देशभरात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपली 5G नेटवर्क  सर्व्हिस सुरु केली आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु झाले आहे. सध्या नेटवर्क स्पीड टेस्ट साईट असणाऱ्या 'ऊकला' च्या नुकत्याच समोर आलेल्या सर्वेक्षण रिपोर्टमध्ये भारतात 5G सर्व्हिस अत्यंत वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  भारत 5G बाबतीत रशिया, अर्जेंटिना, मेक्सिको, श्रीलंका , बांगलादेश, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांच्या पुढे गेला आहे. 'ऊकला' ने जारी केलेल्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार, भारतातील डाऊनलोड स्पीड गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १३.८७ Mbps (मेगा बाईट्स पर सेकंद) वरून ११५ टक्क्यांनी वाढून या वर्षी जानेवारीमध्ये २९.८५ Mbps इतका झाला आहे.

  जानेवारी २०२३ मध्ये भारत इंटरनेट स्पीडच्या बाबतीत ६९ व्या स्थानावर होता परंतु भारतात 5G च्या वेगामुळे भारत ४९ व्या स्थानावर पोहोचला रिलायन्स जीओ आणि एअरटेल 5G यांच्या स्पीडची तुलना करताना ऊकला ने आपल्या सर्वेक्षण रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जानेवारी २०२३ मध्ये जीओ 5G सर्व्हिस वापरणाऱ्या वापरकर्त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये २४६.४९ Mbps चा सरासरी डाऊनलोड स्पीड मिळाला. तसेच तो कोलकात्यामध्ये ५०६.२५ Mbps इतका स्पीड नोंदवला गेला आहे. दरम्यान टेलिकॉम कंपनी असणाऱ्या VI म्हणजेच वोडाफोन-आयडियाचे २०२२ या वर्षांमध्ये वापरकर्त्यांची संख्या सातत्याने कमी झाली आहे. 5G सर्व्हिस सुरु झाल्यानंतर वापरकर्ते मोठ्या प्रमाणात VI सर्व्हिसकडे दुर्लक्ष करत आहेत, असे ऊकला च्या सर्वेक्षण रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत