BREAKING NEWS
latest

आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्भूमीवर मेघवाडी पोलीस ठाण्यात महत्त्वाच्या सभेचे आयोजन

संदिप कसालकर
मुंबई: आगामी येणाऱ्या होळी, धुलीवंदन, शिवजयंती तसेच शब्बे ए बारात सण उत्सवाच्या पार्श्भूमीवर जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी पोलीस ठाण्यात पत्रकार, मोहल्ला कमिटी व महिला दक्षता समिती यांची सभा आयोजित करण्यात आली.
दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महत्त्वाची चर्चा करण्यात आली तसेच शासनाने पारित केलेल्या मार्गदर्शक सूचना वाचून दाखविण्यात आल्या.
या प्रसंगी उपस्थित स्थानिकांनी मे महिन्यात होणाऱ्या चोरी, घरफोडी सारख्या समस्यांवर चर्चा केली. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे तसेच पोलीस निरीक्षक कुडपकर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करत सुट्ट्या दरम्यान गावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तूंना घरी न ठेवता बँक लॉकर मध्ये ठेवण्याचे तसेच आपल्या विश्वासू नातेवाईकांकडे ठेवण्याचे सुचवले.

या संपूर्ण सभेचे आयोजन मेघवाडी पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल मधुकर माने यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत