BREAKING NEWS
latest

मनसे चे राजू पाटील यांच्या आमदार निधीतून मतदारसंघात 'युटीडब्लुटी' आधुनिक तंत्रज्ञानाने रस्ता..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातील रस्त्याचे काम युटीडब्लुटी या आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११० सोनार पाडा, गोळवली मधील नेपच्यून हॉस्पिटल ते शंकरा नगर या भागातील सदर रस्त्याचे बांधकाम या आधुनिक तंत्रज्ञाने होणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.


आमदार राजू पाटील यांनी आपल्या मतदारसंघात आमदार निधीतून विविध विकास कामांचा धडाका लावला असून डोंबिवली येथील गावदेवी नेपच्यून हॉस्पिटल आणि ललित काटा येथे रस्त्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यूटीडब्लूटी (अप्पर थीन व्हाईट टॉप) हे अत्यंत जलद गतीने रस्ते तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान असून या तंत्रज्ञानाचा वापर नेपच्यून रुग्णालय ते शंकरा नगर येथे करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी ४० लाखा रुपायांचा आमदार निधी त्यांनी मंजूर केला आहे या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजू पाटील म्हणाले की कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात हा प्रभाग येत असून महापालिका येथील विकास कामांकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या नवीन रस्त्यांच्या कामासाठी माझ्या आमदार निधीतील फंड मी देत आहे. हे रस्ते तयार झाल्यानंतर धुळी चा त्रास कमी होईल. रस्ते तयार होत असताना लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजू पाटील यांनी यावेळी केले.

 तसेच ललित काटा ते सोनार पाडा तलाव येथे डांबरीकरण रस्ता तयार करण्यात येत असून त्यासाठी २५ लाखांचा आमदार निधीतून फंड देण्यात येत असल्याचे देखील आमदर राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना  सांगितले. शुभारंभ प्रसंगी गणेश म्हात्रे, मनसेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत