BREAKING NEWS
latest

कडोंमपाची मंत्रालयातील निर्देशाला केराची टोपली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे भ्रष्टाचार एवढे वाढले आहेत की मंत्रालयातून आलेल्या निर्देशालासुद्धा केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी केला असून याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबद्दल साळवे यांनी महापालिकेसमोर दोन वेळा केलेल्या धरणे आंदोलनाबाबतीत मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र व ई-मेल केले आहेत. त्यामधून मुख्यमंत्री कार्यालयाकडून अनेक इमेल उत्तरेही प्राप्त झाले आहेत आणि त्यात साळवे यांचे ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाले व पुढील कार्यवाहीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आले आहे असे उल्लेख आहेत. त्या विषयाला धरुन २२ फेब्रुवारी २०२३ रोजी साळवे यांना मुंबई मंत्रालयामधून नगरविकास विभागाअंतर्गत सचिव प्रतिभा पाटील यांचा ईमेल प्राप्त झाला होता. तोच ई-मेल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनाही पाठविण्यात आला होता.

त्यामध्ये संबंधित विषयावर तात्काळ कारवाई करुन तक्रारदाराला कळवावे असा उल्लेख होता. परंतु तो निर्देशित ई-मेल प्राप्त होऊन जवळपास २० दिवसाच्यावर उलटून देखील ना ही कुठल्या अनधिकृत बांधकाम व अनधिकृतपणे थाटलेले व्यवसायावर कार्यवाही करण्यात आली. एकंदरीत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन भ्रष्टाचारात एवढे गुरफटले आहे की ते वरिष्ठांच्या निर्देशालाही महत्व देत नाहीत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत