BREAKING NEWS
latest

'आर आर आर' चित्रपट पाहण्यासाठी अमेरिकेतील चित्रपटगृह हाऊसफुल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या देशभरातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या 'आर आर आर' या चित्रपटाने आता जगभरातील लोकांना वेड लावले आहे. 'आर आर आर' चित्रपटामधील 'नाटू नाटू' या गाण्याला यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे. विशेष म्हणजे ऑस्कर पुरस्कार प्रदान कार्यक्रमात या डान्सचे लाईव्ह सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली आहे.

  'आर आर आर' चित्रपटाचे अमेरिकेतील एका थिएटरमध्ये स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. यावेळी तब्बल दोन हजार आसनांचे हे थिएटर हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. याआधी "नाटू नाटू' या गाण्याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये पार पडलेल्या ८० व्या #गोल्डन ग्लोब पुरस्कार' सोहळ्यात 'आर आर आर' मधील 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजन सॉंग हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

  'नाटू नाटू' हे तेलगु भाषेतील गाणे एम एम.किरवाणी यांनी लयबद्ध केले असून राहूल सिप्लीगंज आणि काल भैरवा यांनी गायलेले हे गाणे एनटी रामाराव ज्युनिअर आणि रामचरण यांच्या धम्माल डान्स परफॉर्मन्सवर चित्रित करण्यात आले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत