BREAKING NEWS
latest

कल्याण खडकपाडा येथे अद्यावत 'ओएसिस हॉस्पिटल' चा उद्घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण शहराचा विकास होत आहे तशी लोकवस्ती देखील वाढताना दिसत आहे. लोकवस्ती वाढल्यानंतर काही गोष्टींची आपल्याला गरज पडत असते ज्या मधली एक गरज म्हणजे वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटल. प्रत्येकाची इच्छा असते की हॉस्पिटलची पायरी कधीही चढायला लागू नये पण काही वेळा एक अद्यावत हॉस्पिटल परिसरात जवळ उपलब्ध असावे  जेणेकरून इमर्जन्सी च्या वेळी कुठेही लांब जायला लागू नये.



कल्याण आधारवाडी डीबी चौक येथे अद्यावत सुसज्ज असे ४० बेडचे 'ओएसिस हॉस्पिटल' आता सुरू झाले आहे. ज्यामध्ये अकरा बेड चे आयसीयू, २ ओ टी व १ लेबर ओ टी, भाजलेल्या रुग्णासाठी स्पेशल वॉर्ड, २४ तास मेडिकल व पॅथॉलॉजी लॅब अशा अत्याधुनिक सर्व सुविधा येथे उपलब्धअसणार आहेत. हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर तर ओ टी चे उद्घाटन आयएमए एक्स प्रेसिडेंट डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेवक सुनील वायले, आयएमए प्रेसिडेंट डॉ. ईशा पानसरे, उद्योजक दीपक भंडारी, उद्योजक मच्छिंद्र जाधव आणि अनेक नामवंत डॉक्टर यांच्या उपस्थित झाले. 




हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले. फिजिशियन डॉ. दयानंद ढेकणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजेश पाखरे, प्लास्टिक सर्जन डॉ. पराग तेलवणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गणेश शिरसाठ अशा कल्याण मधील चार सुप्रसिद्ध डॉक्टरांनी मिळून 'ओएसिस हॉस्पिटल' सुरू केले आहे. विशेष सांगायचं झालं तर गरीब रुग्णांसाठी खास १० बेड राखीव ठेवून कमीत कमी खर्चात त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे यावेळी हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.




« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत