तामिळनाडू राज्यातून ठाण्याच्या कोपरी परिसरात दीड कोटीच्या हस्तिदंतासह दोन आरोपी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही आरोपीकडून दोन हत्तीचे हस्तिदंत हस्तगत करण्यात आले आहेत. तर या दोघांना न्यायालयात नेले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. हत्तीचे दोन हस्तिदंत एका बॅगमध्ये घेऊन ते दोघे विक्री करण्यासाठी ठाण्याच्या कोपरी भागात आले. दरम्यान या विक्री-खरेदी व्यवहाराची माहिती गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला खबऱ्यांमार्फत मिळाली होती.
पोलीसांनी खातरजमा करीत कोपरी परिसरात महामार्गावर हस्तिदंत घेऊन येणाऱ्या व खरीदी करणाऱ्या ग्राहकांची वाट पाहताना पोलीस पथकाच्या दोघे दृष्टीस पडले. युनिट-५ च्या पथकाने त्यांना हेरले आणि संशयावरून त्यांना हटकले असता त्यांचा संशय खरा ठरला व दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व त्यांच्याकडील दोन हस्तिदंताचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर दोन हस्तिदंताची किंमत दिड कोटीची असल्याची माहिती आरोपींनी पोलीसांना दिली. या दोघा आरोपीना न्यायालयात नेले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटक दोन्ही आरोपींची पोलीस पथक सखोल चौकशी करीत आहे व हस्तिदंत कुणाला विकण्यासाठी आणलेले होते. याबाबत पोलीस अधिक चौकशी व तपास करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा