BREAKING NEWS
latest

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन तर्फे 'आई महोत्सव' दिमाखात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन तर्फे गेली १३ वर्ष 'कै. रिटा पॉल आई महोत्सव' आयोजित करण्यात येत आहे. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आपला विकास, मुलांचा उत्कर्ष व समाजासाठी आदर्श बनणाऱ्या सामान्यातील असामान्य अश्या १० आई श्रीमती सुनेत्रा चंद्रशेखर पाटील, लता कळसकर, बेन्सी जोसेफ, ललिता अंबादास डोंगरे, लीला शिंगोले, संध्या मंगल अंभोरे, रेणुका नाईक, लीलावती लक्ष्मण म्हात्रे, निर्मला धोत्रे, मोनाबाई काळूराम बांगर यांचा  सत्कार रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. कैलाश जेठानी व डॉ. अरुण पाटील यांचे हस्ते झाला. 
'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन' अध्यक्ष ऍनी बिजॉय, पॉल पेरापिल्ली, डॉमनिक व जॉन पॉल, डेव्हिड ओमन, सेक्रेटरी निकीता जैन व योगेश झांबरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला तसेच निकीता जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत