शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यात डोंबिवली पोलीसांना यश आले आहे. मोबाईल दुकानाचे शटर उचलटून मोबाईल चोरणाऱ्यांना डोंबिवली रामनगर पोलीसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान (वय: २५ वर्षे) राहणार: श्री समर्थ सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व आणि सागर श्याम पारखे (वय: २३ वर्षे) राहणार: श्री समर्थ कृपा, कृपा सर्विस सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व, असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून गुन्हा घडल्यापासुन अवघ्या १२ तासात दोघा चोरट्यांना पकडण्यात डोंबिवली रामनगर पोलीसांना यश आले. चोरट्यांकडून एकूण रुपये २,३७,०६०/- किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. १४ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील उर्सेकर वाडी येथील मधुबन गल्लीतील नव डोंबिवली सोसायटी, डी-विंग, गाळा न.३० येथील 'प्रिया मोबाईल'च्या दुकानाचे शटर दोन अनोळखी इसमांनी उचकटुन दुकानात प्रवेश करून एकूण रुपये ४,०७,१२०/- किंमतीचे मोबाईल चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्यादी सुंदरम विश्वनाथ गवंडर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि तडवी (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि केशव हासगुळे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशिराम लोखंडे, पोहवा विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड यांनी मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू केला. दोघा चोरट्यांना फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान आणि सागर श्याम पारखे यांना गुन्हा घडल्यापासून अवघ्या १२ तासाच्या आत अटक केली. अटक केलेल्या चोरट्यांवर मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाण्याचे सपोनि बळवंत भराडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबीवली विभाग, सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शन व देखरेखी खाली सपोनि वळवंत भराडे, केशव हासगुळे, पोउनि विजय कांबळे, पोहवा सुनिल भणगे, भालेराव, तुळशिराम लोखंडे, विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड, राहुल ठाकूर यांनी कामगिरी बजावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा