BREAKING NEWS
latest

महिला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेण्याचा उपविजेती वैष्णवी पाटील हीचा मोठा गाव यात्रेत निर्धार..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली पश्चिम येथील गावदेवी माता यात्रेनिमित्त मोठा गाव देवीचा पाडा येथील ग्रामदेवता श्री गावदेवी आईच्या निमित्त देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने कुस्तीच्या जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून 'महिला महाराष्ट्र केसरी'ची उपविजेती वैष्णवी पाटील यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आगामी महिला महाराष्ट्र केसरीच्या विजेतीपदाची गदा घेऊन येणार असल्याचा निर्धार कुस्तीपट्टू वैष्णवी पाटील यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला. मोठा गाव येथील होत असलेल्या महिला कुस्ती सामन्यांमध्ये वैष्णवी पाटील या सहभागी होत असत.

यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, राजेश मोरे, सुरेश मोरे, एकनाथ म्हात्रे, हरिचंद्र पाटील, मनसेचे प्रकाश भोईर, 'महाराष्ट्र केसरी' सईद चौस तसेच मोठा गाव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दीपेश म्हात्रे यांनी वैष्णवी पाटील यांचा चांदीची गदा देऊन सत्कार केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना वैष्णवी पाटील म्हणाल्या की, या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये गावातील जत्रा आणि ग्रामस्थ मंडळाचे आणि येथील प्रशिक्षकांचे मी आभार मानते. तसेच राजतातून आलेल्या स्पर्धकांना स्फूर्ती आणि प्रोत्साहन देण्यासाठी 'महिला महाराष्ट्र केसरी'ची उपविजेती वैष्णवी पाटील हिने गदा घेऊन कुस्तीच्या आखड्याला एक फेरा मारला.

मी 'महाराष्ट्र केसरी'ची उपविजेती झाल्यानंतर मला सर्व स्तरातून खूप प्रेम मिळाले. मी जरी उपविजेती झाले असले तरी हे मला इतके मिळालेले प्रेम पाहून माझ्या मनात आता अशी भावना निर्माण झाली आहे की, मी आगामी 'महिला महाराष्ट्र केसरी' विजेती पदाची गदा खांद्यावर घेऊन येणार आहे. यासाठी मी अधीक मेहनत घेऊन परिश्रम करत आहे.

तर दीपेश म्हात्रे म्हणाले की तुम्ही पाहिले असेल की, या कुस्ती सामन्यांमध्ये लहान लहान मुलांनी भाग घेतला होता. हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. यातून अनेक वैष्णवी पाटील आणि सईद चौस सारखे खेळाडू घडत असतात. हा खेळ  अधिकाधिक मुलांपर्यंत जावा यासाठी ट्रस्ट प्रयत्न करीत आहे. या कुस्ती सामन्यात हजार एक कुस्तीगीर सहभागी झाले होते. राज्याच्या गावागावातून स्पर्धेसाठी एक कुस्तीगीर आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. हे सामने पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक रसिक जमा झाले होते.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत