BREAKING NEWS
latest

कल्याण जिल्हा भाजपा तर्फे परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याचे वतीने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोहोचावेत व  सामाजिक समरसता सर्वांगी रुजावी याकरिता बाबासाहेबांनी केलेले काम जगातील सर्वात लोकशाही मोठी असलेल्या देशाचे लिहिलेले संविधान कायदा हा सर्वात मोठा आहे. सर्वांना समान न्याय मिळावा, कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत हेच विचार बाबासाहेबांनी रुजवले. पूर्वीच्या जातीवादाच्या भिंती मोडून सर्व समाजामध्ये शिक्षण रुजलं पाहिजे समाजातील तळागाळातील घटक मोठा झाला पाहिजे याकरता बाबासाहेबांनी देशातल्या सर्व जातींसाठी काम केले.

यंदाच्या १३२ व्या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नाना सूर्यवंशी, मनोज राय, अर्जुन म्हात्रे, विलास खंडी झोड, मुकेश सेंघानी, मोरेश्वर भोईर, अनिरुद्ध जाधव, अर्चना सूर्यवंशी, नितीन शिंदे, संतोष शिंदे, संतोष होळकर तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत