BREAKING NEWS
latest

भारतात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची तोफखाना रेजिमेंटमध्ये नियुक्ती..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भारतीय सैन्य दलात विविध रेजिमेंट्समध्ये आता महिला अधिकारी उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. महिला अधिकाऱ्यांच्या या धैर्याला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे. भारतीय लष्कराच्या तोफखान्यातील इतिहासात पाहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

'ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी' चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच महिला अधिकाऱ्यांची आज तोफखानाच्या रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट मेहक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे, लेफ्टनंट अदिती यादव आणि लेफ्टनंट पवित्र मुदगील अशी या महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पाच महिला अधिकार्‍यांपैकी तीन चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या तुकड्यांमध्ये आणि इतर दोन पाकिस्तानच्या सीमेजवळील “आव्हानात्मक ठिकाणी” तैनात आहेत.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत