BREAKING NEWS
latest

डोंबिवली पोलीसांनी ९५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करत रिक्षा व मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी येथील 'बंदिश पॅलेस' हॉटेल शेजारी चोळेगाव तलावाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला ऑटो रिक्षा क्र. एमएच ०५ / सीजी-७९८२ ही हॅन्डल लॉक करुन पार्क करून ठेवलेली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेल्याची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २१/०४/२०२३  रोजी गुन्हा रजि क्र. १४६ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान सपोनि. योगेश सानप, पोहवा. सरनाईक, पोअं. सांगळे यांनी नमुद गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजुबाजुच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन संशयीत आरोपी हे नमुद गुन्ह्यातील ऑटो रिक्षा क्र. एमएच ०५ / सीजी - ७९८२ ही चोरी करून घेवून जाताना दिसुन आल्याने सदर आरोपींना गुप्त बातमीदार व तांत्रिक मदतीच्या आधारे पिसवली, कल्याण येथुन नमुद गुन्ह्यातील ऑटो रिक्षाचे पार्ट विक्री करत असताना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नमुद गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांचेकडे अजुन एक आर-१५ यामाहा कंपनीची मोटार सायकल क्र. एमएच ०१/डीएच - ५३६३ देखील मानपाडा पोलीस ठाणे हददीतुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर दोन आरोपींकडुन डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि.क्र. १४६/२०२३ कलम ३७९.३४ भादंवि व मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्र. ८४९/२०२३ कलम ३७९ भादंवि असे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात डोंबिवली पोलीसांना यश आले आहे.

  सदरची कामगिरी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, यांच्या मार्गदर्शनाखाली डोबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, पोअं. नितीन सांगळे, पोशि. निलेश पाटील, गिरीश शिर्के यांनी कामगिरी केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत