BREAKING NEWS
latest

भाजपच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव आणि साईबाबा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भाजपाचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आणि माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या वतीने डोंबिवली पश्चिम येथे गुप्ते क्रॉस रोडवर श्रीराम नवमी आणि साईबाबा प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे भेट देऊन दोन्ही उत्सवासाठी उपस्थित राहिलेल्या भाविकांना शुभेच्छा देत श्रीराम व साईबाबा यांचे मनोभावे दर्शन घेतले. सायंकाळी जनार्दन पेडणेकर बुवा आणि संजय पवार बुवा यांच्या डबलबारी भजनाचा अटीतटीचा सामना रंगला. हा सामना पाहण्यासाठी डोंबिवलीतील रसिकांनी तोबा गर्दी केली होती. श्रीराम आणि साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती .यात महिला भाविकांची लक्षणीय संख्या होती. या भाविकांना प्रसाद म्हणून सकाळी साडेदहा  वाजल्या पासून रात्री साडेअकरा वाजे पर्यंत भंडाऱ्याचे आयोजन केले होते. रात्री मध्यरात्रीपर्यंत हा भंडारा सुरू होता. या महाभंडाऱ्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. गेली अनेक वर्ष धात्रक कुटुंबाच्या वतीने हा उपक्रम विष्णुनगर प्रभागात आयोजित करण्यात येत असतो. डोंबिवली पश्चिम येथील रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर येथे व नगरसेवक म्हणून धात्रक दांपत्याने दोन टर्म आपल्या दोन्ही प्रभागात विकास कामे केली आहेत. नागरिकांना सार्वजनिक सोयी सुविधांचा लाभ मिळवून दिल्यामुळे धात्रक कुटुंब आणि आगामी काळात बहुदा सामाजिक सेवेमध्ये प्रवेश करणारी त्यांची कन्या पूजा हे लोकप्रिय झालेले आहेत. डोंबिवली पश्चिम येथील भाजपाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांच्या साह्याने सदर उत्सव उत्साहात संपन्न झाला.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत