BREAKING NEWS
latest

विविध उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चा एक शैक्षणिक उपक्रम..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  आज दिनांक ६ मे २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या कोतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे विद्यार्थ्यांना टेबल टेनिस टेबल आणि इतर साहित्य भेट देण्यात आले. सदर भेट ही महासंघाचे हितचिंतक श्री. अभिजित वैद्य ह्यांच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीय ह्यांच्या तर्फे भालचंद्र वैद्य ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आली. ह्या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता पाखले, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कार्यकारिणी सदस्य ऍड.सौ. माधुरी जोशी तसेच विद्यालयाचे शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शाळेतर्फे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे आभार मानले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत