BREAKING NEWS
latest

कल्याणमध्ये स्विफ्ट गाडीच्या डिक्कीतून बेशुद्धावस्थेत गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी; पोलीसांना पाहून आरोपी फरार..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण पश्चिम येथे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झालेल्या गोवंशीय जातीची जनावरं स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी सुरु होती. कल्याण बाजारपेठ पोलीसांनी छापा मारून एका आरोपीला ताब्यात घेत २ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. तर ५ आरोपी फरार झाले आहेत. कल्याण पश्चिमेत गोवंशीय जातीच्या जनावरांना गुंगीचे औषध देत बेशुद्धावस्थेत स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी छापा मारत सोयब निजाम करके या आरोपीला रंगेहाथ पकडत २ गोवांशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. बाजारपेठ पोलीसांनी एक रिक्षा आणि २ स्विफ्ट गाड्या असा एकूण  २,६०,००० /- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनानुसार गुन्हा दाखल करत या तस्करीत फरार झालेल्या ५ आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कल्याण बाजारपेठ पोलीसांना कल्याण पश्चिमेकडील रेतीबंदर खाडी परीसरात जीन्स कारखान्याजवळ सार्वजनिक मोकळी जागा आहे. या ठिकाणी गाईंना आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलप यांना  मिळाली होती. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि अरुण घोलप, पोलीस हवालदार सचिन साळवी, प्रेम बागुल, बाविस्कर, पावसे व पोलीस नाईक कातकडे, फड यांच्या पथकाने कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सागर इमारतीच्या शेजारी खाडीकिनारी छापा मारत आरोपी सोयब निजाम करके (वय: ३२ वर्ष) याला रंगेहात पकडत २ गाईंची सुटका केली. तर या छापेमारी दरम्यान १) इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी, २) अरबाज, ३) गोरू, ४) मच्छी, ५) आवली, ६) बारक्या असे सहा आरोपी फरार झाले आहेत. नमूद २ गोवंशीय  जातीच्या जनावरांना बापगांव  गोशाळा येथे पुढील संगोपनासाठी जमा करण्यात आले आहे.

बाजारपेठ पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी संगनमत करून ग्रामीण भागात रानामध्ये चारा खात असलेल्या गोवंशीय जातीच्या जनावरांना गुंगीचे इंजेक्शन मारायचे आणि नंतर ही जनावर खाली बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना एका चादरीमध्ये गुंडाळून पाच ते सहा जण मिळून त्यांना स्विफ्ट गाडीच्या डिक्कीमध्ये भरून वाहतूक करून कत्तल  करायचे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत