BREAKING NEWS
latest

डोंबिवली शाखेची वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

   डोंबिवली वाहतूक उपविभागाअंतर्गत म्हसोबा चौक,९० फिट रोड, डोंबिवली पुर्व या ठिकाणी दिनांक २४/०६/२०२३ रोजी सकाळी ११  ते १२ वाजण्याच्या दरम्यान मा. डॉ.श्री विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त, वाहतूकविभाग ठाणे शहर यांचे आदेशाने फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई करण्यात आली असून मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.
विदाऊट हेल्मेट  - ४९, विदाऊट सीट बेल्ट २२, जम्पिंग सिग्नल ०६, ब्लॅक स्क्रीन फिल्म ०१,  ट्रिपल सीट ०४,  फ्रंट सीट ०३, गणवेश न घालने ०३ व इतर ९४ अशा एकूण १८२ कसूरदार वाहनचालकावर कारवाई करून रुपये १,०३,१५०/- इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी रूपये ७२,९००/- दंड जागीच रोख वसूल करण्यात आला आहे.
  या कारवाई मध्ये डोंबिवली वाहतूक विभागाचे ०१ अधिकारी, ०९ पोलीस अंमलदार व ०८ वॉर्डन तसेच कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे ०२ अंमलदार, ०१ वॉर्डन व कल्याण वाहतूक उपविभागाचे ०२ पोलीस अंमलदार असे एकूण ०१ अधिकारी, १३ अंमलदार, ०९ वॉर्डन या कारवाई दरम्याम हजर होते. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सीसीटिव्ही कॅमेराद्वारे वाहतूक विभागाकडून ई-चलन कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली असे डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत