BREAKING NEWS
latest

डोंबिवली शिवसेनेकडून जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिर्धेबाबत केलेल्या विधानावर कडाडून जाहीर निषेध..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  आनंद दिघे साहेबांची सणसणीत कानाखाली खाल्लेला जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळेच आव्हाड यांनी शरद पवार यांच्यामुळे आनंद दिर्धेची जेल मधून सुटका झाली असे विधान केल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला. डोंबिवली शिवसेना शहर मध्यवर्ती शाखा कार्यालयात पत्रकार परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यचा निषेध शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

  जितेंद्र आव्हाड यांनी एका सभेमध्ये बोलताना शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांची 'टाडा' च्या गुन्ह्यातून सुटका झाली असं विधान केलं होतं. याबाबत बोलताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शिल्लक सेना असा उल्लेख करत "धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तुम्ही सोडली. मुस्लिम धार्जिणे जिथे धर्माचं राजकारण करतात अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही राजकारण करता, कुठेतरी तुम्ही लाज बाळगले पाहिजे. तुम्ही जाहीर निषेध करा" असे आव्हान देखील उद्धव ठाकरे गटाला यावेळी करण्यात आलं. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी इथून पुढे पुन्हा असं वक्तव्य केलं तर शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील शिवसेना शिंदे गटाकडून दिला. 

  यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील, संतोष चव्हाण, प्रकाश माने, बंडू पाटील, रवी मट्या पाटील, पंढरीनाथ पाटील, नकुल गायकर आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत