BREAKING NEWS
latest

राज्यात सप्टेंबर-ऑक्टोंबर मध्ये निवडणुका होण्याचे संकेत..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना आता राज्यात निवडणुका लवकर होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात २३ महानगरपालिकांची मुदत संपली असून त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचा आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे. ५ जुलै २०२३ रोजी काढलेले हे परिपत्रक आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे म्हटले होते.

राज्यात २३ महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील ९२ नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात करायला हरकत नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत