BREAKING NEWS
latest

रेल्वे प्रशासनाने आणखी ५२ ट्रेनची घोषणा करत गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी दिली खुशखबर..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

गणपती उत्सव हा कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. यंदा सप्टेंबर महिन्यात बाप्पांचं आगमन होणार असून चाकरमानी आतापासून कोकणात जाण्याचं नियोजन करतात. बाप्पांच्या आगमनासाठी भाविक तयारीला लागलेत. गावी जाण्याच्या ओढीने ट्रेन, बस किंवा खासगी वाहतूकीने चाकरमानी सुट्टी टाकून कोकणात पोहोचतो. यात ट्रेन प्रवासाला जास्त प्राधान्य दिलं जातं. पण ट्रेनला प्रचंड गर्दी होत असल्याने दरवर्षीच प्रवाशांचे हाल होतात. यंदा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केलं आहे. चाकरमन्यांना कोकणात जाताना सोईस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने १५६ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता.

यात आता आणखी जादा ५२ ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे आता एकूण २०८ ट्रेनची सेवा कोकणात प्रवाशांना मिळणार आहे. ५२ ट्रेनमध्ये दिवा-चिपळूण दरम्यान आणखी ३६ मेमू स्पेशल आणि मुंबई- मंगळुरु दरम्यान १६ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत.

असे आहे स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक:

(अ) दिवा-चिपळूण मेमू विशेष सेवा - ३६ फेऱ्या

01155 मेमू दिवा इथून १३.०९.२०२३ ते १९.०९.२०२३  आणि २२.०९.२०२३ ते  ०२.१०.२०२३  पर्यंत दररोज १९:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०१:२५ वाजता चिपळूणला पोहोचल.

01156 मेमू चिपळूण इथून १४.०९.२०२३ ते २०.०९.२०२३  आणि २३.०९.२०२३ ते ०३.१०.२०२३ पर्यंत रोज १३:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी  १९:०० वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी,  कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.

ब) मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा - १६ सहली

01165 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५.०९.२०२३, १६.०९.२०२३, १७.०९.२०२३, १८.०९.२०२३, २२.०९.२०२३, २३.०९.२०२३, २४.०९.२०२३ आणि ३०.०९.२०२३ ला २२:१५ वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन १७:२० वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

01166 स्पेशल मंगळुरु जंक्शन
१६.०९.२०२३, १७.०९.२०२३, १८.०९.२०२३, १९.०९.२०२३, २३.०९.२०२३, २४.०९.२०२३, ३०.०९.२०२३ आणि ०१.१०.२०२३ ला १३:३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.



 

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत