BREAKING NEWS
latest

उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीच्या राजकारणात झेप घेण्यास सज्ज..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
राज्यात गेल्या आठवडाभर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दमदार राजकीय डावपेचांची चर्चा सुरू आहे. शिंदे- फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमध्ये सामिल झालेले अजित पवार फक्त राज्यातील सत्तेमध्ये संतुष्ट नसुन ते आता केंद्रातही झेप घेण्यास सज्ज झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी सगळ्या पक्षांनी सुरू केली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु असताना आता भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. एनडीएची १८ जुलैला दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या बैठकीच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात एंट्री होणार आहे असे बोलले जाते. केंद्रस्तरावर कोणाचेही सरकार असो मात्र तेथे आजपर्यंत शरद पवार यांच्या नावाचा दबदबा होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार या बैठकीच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात स्वत:ची छबी निर्माण करण्याची तयारी करणार असल्याचे दिसून येत आहे.

भाजपने १८ जुलै रोजी बोलवलेल्या या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसच गेल्या काही दिवसात भाजपपासून फारकत घेतलेले अकाली दलचे सुखबीर सिंग बादल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू सुद्धा पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसचं लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवानही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक वर्षभरावर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे देखील बिगुल वाजणार आहे. या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.अजित पवार यांना केंद्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पक्ष म्हणून गमावलेले स्थान परत मिळवण्यासाठी मोठी संधी या निमित्ताने अजीत पवारांना मिळू शकते असे वर्तवले जात आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत