BREAKING NEWS
latest

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत प्रभागात लाभार्थींना अर्ज वाटप..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

केंद्र शासनामार्फत पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना कर्जासाठी अर्ज वाटप सुरू झाले असून कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे सर्व  प्रभागांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभागांमध्ये काल शनिवारपासून  कर्ज देण्यासाठी अर्ज भरुन घेण्याचे काम सुरू झाले असुन प्रभागातील फेरीवाले, रिक्षावाले, भाजी विक्रेते, घर कामगार अशा अनेक गरजूंना दहा हजार रुपये कर्ज देण्यासाठी नोंदणी करण्याचे काम महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्रांमध्ये सुरू आहे. काल 'फ'  प्रभागांमध्ये सहाय्यक आयुक्त  चंद्रकांत जगताप यांच्या उपस्थितीत नोंदणी चे काम सुरू करण्यात आले. यावेळी बचत गटाचे सदस्य लाभार्थी म्हणून उपस्थित होते.

या 'पंतप्रधान स्वनिधी योजना' निधीचा लाभ सगळ्या कष्टकरी लाभार्थी व्यवसायिकांनी घ्यावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. डोंबिवली पूर्व येथील पी.पी.चेंबर मधील 'फ' प्रभागाच्या पालिका विभागीय कार्यालयात लाभार्थ्यांची नोंदणी सुरू आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत