BREAKING NEWS
latest

चांद्रयान-३ साठी शेवटचे १५ मिनिटे कसोटीचे..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

भारतासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. चांद्रयानाच्या लँडिंगचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार आहे. या मोहिमेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, चांद्रयान-३ साठी शेवटचे १५ मिनिटे कसोटीची असल्याची माहिती मिळत आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी अभिषेक आणि होम-हवन करण्यात येत आहेत. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली जात आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. २३ ऑगस्टला भारताला इतिहास रचण्याची संधी आहे. चांद्रयान-३ च्या 'विक्रम लँडर'ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले तर जगात असा विक्रम करणारा भारत चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, चीन आणि सोव्हिएत युनियनने या तंत्राज्ञानात प्रभुत्व मिळवले आहे.

चांद्रयान-३ लँडिंगचे टप्पे पुढीलप्रमाणे..

* चंद्राच्या पृष्ठभागापासून लॅण्डरची उंची ८०० मीटर ते १३०० मीटर असेल.
* विक्रमचे सेन्सर्स कार्यान्वित होतील आणि त्याची उंची मोजली जाईल.
* पुढच्या १३१ सेकंदात लॅण्डर पृष्ठभागापासून १५० मीटरवर येईल.
* लॅण्डवरचा धोकाशोधक कॅमेरा पृष्ठभागाच्या प्रतिमा कॅप्चर करेल.
* विक्रमवर बसवलेला धोका शोधणारा कॅमेरा रन करेल.
* प्रतिकूल परिस्थिती असेल तर विक्रम ७३ सेकंदात चंद्रावर उतरेल
* नो- गो अट असेल तर १५० मीटर पुढे जाऊन थांबेल.
* पुन्हा पृष्ठभाग तपासेल आणि सर्व ठीक असेल तर लॅण्ड होईल.

पंतप्रधान मोदी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत. तरी देखील जेव्हा चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, त्यावेळी 'इसरो' सोबत व्हिडिओद्वारे संपर्कात राहत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे.

सन २०१९ मध्ये चांद्रयान-२ यशाच्या अगदी जवळ होते. 'लॅण्डर मॉड्यूल'ने चंद्राच्या पृष्ठभागावर २.१ किमी उंची गाठली होती. किरकोळ तांत्रिक बिघाड झाला आणि लॅण्डर क्रॅश झाले होते. त्यामुळे चांद्रयान-३ साठीही शेवटचे १५ मिनिटे कसोटीची मानली जात आहेत. भारतीय वेळेनुसार २३ ऑगस्ट संध्याकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी चांद्रयान-३ चे लॅण्डर चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणार आहे.

उत्तर प्रदेशातील सर्व शळांमध्ये होणार चांद्रयान-३ च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण

आज, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांला चांद्रयान-३ चे लँडिंग होणार आहे. प्रत्येक भारतीयाला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे. उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागाने यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. चांद्रयानाच्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण यूपीच्या सर्व शाळांमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सर्व शाळकरी मुलांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता येणार आहे.

इसरोकडून चांद्रयान-३ च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था

इसरोकडून (ISRO) चांद्रयान-३ च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ०५ वाजून २७ मिनिटांला सुरू होणार आहे इसरो (ISRO) ची अधिकृत वेबसाईट <isro.gov.in>, युट्युब(YouTube) वर <youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss>, फेसबुक(Facebook) वर <https://facebook.com/ISRO>, तसेच डीडी नॅशनल टीव्ही चॅनलवर तुम्ही चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.

जवाहरलाल नेहरू प्लानेटोरियममध्ये विशेष शो

चांद्रयान-३ च्या चंद्रावरील लँडिंगची संपूर्ण देशातील जनतेला उत्सुकता आहे. बुधवारी सायंकाळी हे लँडिंग होणार आहे. या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू प्लानेटोरियममध्ये विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार सकाळी साडे नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत ३० मिनिटांचे 'मून सायन्स'वर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. याच चांद्रयान-२ चे अपयश आणि चांद्रयान-३ चा चंद्रापर्यंतचा प्रवासाबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच चंद्रावर विशेष कार्यक्रम ११ वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असणार आहे. त्यानंतर ११ वाजता, १ वाजता, ३ वाजता, ५ वाजता आणि ६ वाजता 2D आणि 3D शो होणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत