BREAKING NEWS
latest

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुखरूप पोहोचणारा भारत जगातील पहिला देश..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यूल बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेल्या लँडर मॉड्यूलने संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग केले.

चंद्रावर लँडिंग; अभिनंदन, भारत !

इसरोने चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगची माहिती सोशल मीडियावर खास पद्धतीने शेअर केली. इसरोने लिहिले, भारत, मी माझ्या गंतव्यस्थानावर सुखरूप पोहोचलो आहे आणि तुम्हीही ! चांद्रयान-३ चंद्राच्या पुष्टभागावर सुखरूप पोहीचण्यास यशस्वी झाले. चंद्रावर अलगद लँडिंग झाले. अभिनंदन, भारत !

मोदींनी केले अभिनंदन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इसरो' च्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले, आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकार झाला. पंतप्रधान म्हणाले, “माझ्या प्रिय कुटुंबीयांनो ! असा इतिहास डोळ्यांसमोर घडताना पाहिल्यावर आम्हाला अभिमान वाटतो. अशा ऐतिहासिक घटना देशाच्या जीवनाची जाणीव करून देतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अभूतपूर्व आहे. हा क्षण भारताच्या जयघोषाचा क्षण आहे. हाच क्षण संकटांचा महासागर पार करण्याचा. हा क्षण आहे विजयाच्या चंद्रमार्गावर चालण्याचा. हाच क्षण आहे बळाचा. १४० कोटी हृदयांच्या धडकण्याचा हा क्षण आहे. हा भारताच्या विजयाचा क्षण आहे. नवीन ऊर्जा, नवीन चेतना तसेच भारताच्या उगवत्या नियतीला हाक देण्याचा हा क्षण आहे. अमृतकालच्या पहिल्या पहाटे यशाचे अमृत बरसले आहे. आम्ही पृथ्वीवर प्रतिज्ञा घेतली आणि साकार झाली ती चंद्रावर.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत