डोंबिवली येथील अनुरथ धबाले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, राष्ट्रीय युवा नेते भय्यासाहेब इंदिसे आणि प्रदेश अध्यक्ष विकास निकम यांनी धबाले यांची निवड केली आहे. परभणी येथील भारसवाडा गावात सरपंच म्हणून संधी मिळताच अनेक विकास कामांचा धडाका त्यांनी लावला होता. गावात कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरक्षणामुळे योगायोगाने सरपंच झालेल्या अनुरथ धबाले यांनी अंगभूत गुणांनी गावांत शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या निधीतून अनेक योजना जनसामान्यांसाठी राबविल्या आहेत. आता कल्याण डोंबिवली येथे रिपाइं एकतावादी पक्षाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, तसेच राजकीय क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय धबाले यांनी घेतला आहे. गावात पक्का रस्ता, ७० घरांसाठी माता रमाई आवास योजना, परभणीत सरपंच मेळाव्याचे आयोजन, शेतकऱ्यांच्या पिक विमासाठी मोर्चा, आरोग्य केंद्र कर्मचारी भरती आंदोलन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चबुतरा निर्माण, गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची फिल्टर यंत्रणा, नळपाणी योजना, लसीकरण प्रचार मोहीम, वृक्षारोपण, अश्या अनेक योजना राबविल्या. डोंबिवली मध्ये राजश्री शाहू महाराज यांचे स्मारक व्हायला पाहिजे. झोपडपट्टी वासीयांना टॅक्स लागला पाहिजे. कल्याण-डोंबिवली शहर झोपडपट्टी मुक्त होऊन त्यांचे पुनर्वसन झालं पाहिजे. महापालिकेने झोपडपट्टीमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या पाहिजे यासाठी ते क्रियाशील राहणार आहेत. तसेच पक्षकार्य, पक्षबांधणी, पक्षाचे विविध उपक्रम पक्षाचे नेते आणि वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे अनुरथ धबाले यांनी प्रसिद्धी माध्यमांसोर सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा