BREAKING NEWS
latest

साखर उत्पादनात दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे होणार लक्षणीय घट..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
  गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसाचा खंड पडला आहे. परिणामी पिके वाळू लागली असून जनावरांचेही हाल सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे उत्पादन घेतले जाते परंतु यंदा कमी पावसाने कोल्हापूर वगळता राज्यातील ऊस पट्ट्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दरम्यान सोलापूर आणि मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी ऊस कापून घालण्यास सुरूवात केली आहे. परिणामी आगामी काळात साखर उत्पादनात लक्षणीय घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

येत्या हंगामात राज्यातील साखरेचे उत्पादन यंदाच्या १०५ लाख टनांवरून ९० लाख टनांपर्यंत येण्याची शक्यता आहे, असा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांनीही अंदाज व्यक्त केला आहे. 'वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन' (WISMA) ने ऑगस्ट २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात १५ टक्क्यांनी घट होऊन १०३ लाख टनांवर जाण्याचा अंदाज वर्तवला होता. 'WISMA' सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नवीन अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर राज्यातील साखर कारखान्यांना गाळपासाठी उसाची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत