BREAKING NEWS
latest

शेतकऱ्यांवर पिकांना पावसाने दडी मारल्यामुळे टँकरने पाणी देण्याची वेळ..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
  जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे, खरीप हंगाम च्या सुरुवातीला मान्सूनचा पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी विलंबाने केली, शेतकऱ्यांना उत्पादनात भर देणाऱ्या मूग आणि उडीद पिकांची पेरणी वेळेवर होऊ शकली नाही, जेमतेम शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी तसेच ज्वारी पिकांची पेरणी केली, मध्यंतरी चांगला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले पीक हिरवेगार होऊन त्याला शेंगा लागायला सुरुवात होताच अचानक पावसाने दडी मारली.

यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपायला सुरुवात झाल्याने पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे, बाळापूर, पातूर, बार्शी, टाकळी तालुक्यातील बहुतांश भागात शेतकरी पिकांना टँकरने पाणी देत आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत